पाणी तुंबल्याने डोंगरेवाडीतील मळेशेती आली अडचणीत

महेश बापर्डेकर 
शुक्रवार, 13 जुलै 2018

आचरा - गाळामुळे सुमारे २५ एकर शेतीक्षेत्रात पाणी तुंबल्याने येथील डोंगरेवाडीतील मळेशेती अडचणीत आली. पाण्याचा निचराच होत नसल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत. यातच पेरलेले बियाणेही कुजल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे आहे. 

याबाबत प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन पाणी वाहून जाणाऱ्या मार्गाचा गाळ उपसा करण्याची मागणी डोंगरवाडी ग्रामस्थांमधून होत आहे.

येथील मळे शेतीत पिकणाऱ्या भात शेतीवर येथील बहुतांशी कुटुंबाची गुजराण होते; पण महिनाभर बरसणाऱ्या पावसाचे शेतीत साचलेल्या सुमारे दीडदोन फूट उंचीच्या पाण्याचा निचराच होत नसल्याने शेतात पेरलेल्याची देखभाल व नविन लागवडीसाठी शेतकऱ्यांना शेतात जाता येत नाही आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांना शेतात पेरलेल बियाणे डोळ्या देखत कुजून जाताना बघत बसण्याशिवाय पर्याय नाही.

ओढ्याच्या पाण्यासोबत शेतात घुसणारा प्लास्टीक कचरा, खाजन भागाकडून येणारे भरतीचे पाणी, पावसाचे पाणी यामुळे पाणी वाहून जाणारा भाग कांदळवन आणि मारांडी रानाने आक्रसलेला आहे. त्यातच ओढ्याच्या पाण्याबरोबर वाहून येणाऱ्या कचऱ्याने पाणी वाहून जाणाऱ्या भागात गाळ साचल्याने शेत जमीनीच्या मानाने बाहेर पाणी वाहून जाण्याचा भाग उंच बनला आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा हवा तसा होत नाही. त्यातच ग्रामपंचायतीकडून सांडी येथील भागात काँक्रिट मध्ये बसवलेल्या सिमेंट पाईपची उंची जास्त असल्याने पाणी वाहून जात नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याबाबत ग्रामस्थ नामदेव देसाई, संजय परब, एकनाथ परब, सुजीत कोकम यांनी ही समस्या दूर करण्याची मागणी केली आहे.

३० कुटुंबांसमोर चिंतेचे सावट
या पाण्यामुळे सुमारे २५ एकरवरील भातपीक अडचणीत आले. सुमारे ३० शेतकरी दरवर्षी येथे शेती करायचे. यंदा पाणी तुंबल्याने यातून मार्ग कसा काढावा, या चिंतेत ते आहेत.

Web Title: Due to water scarcity