त्या चुकीच्या मेसेजमुळे दापोलीत परप्रांतीयांचा उडला गोंधळ...

Due to that wrong message there was confusion among the foreigners in Dapoli.
Due to that wrong message there was confusion among the foreigners in Dapoli.
Updated on

दापोली (रत्नागिरी) : आम्हाला आमच्या गावी जायचे आहे, आमची जाण्याची व्यवस्था करा असे म्हणत  दापोली नगरपंचायतीच्या कार्यालयावर अनेक परप्रांतीय धडकले, प्रशासनाने अखेर त्यांची समजूत काढून त्यांना पुन्हा घरी पाठवून दिले.
 कोरोनाच्या प्रादुर्भवामुळे देशभर सरकारने लॉकडाऊन केले त्यामुळे मजुरांच्या हातातील काम गेले, दापोली शहरात तसेच तालुक्यात पोट भरण्यासाठी अनेक परप्रांतीय लोक आलेले आहेत, दररोज काम करून मिळालेल्या मजुरीतून ते आपल्या कुटुंबाचे पोट भरत होते, मात्र लॉकडाऊन सुरू झाल्यावर हाताला कामच मिळत नसल्याने अनेकांना खायचे काय असा प्रश्न पडला, सरकार व स्वयंसेवी संस्थांनी त्यांना जीवनावश्यक वस्तू पुरवून त्यांची रोजची भुकेची गरज भागवली आहे, मात्र हे किती दिवस चालणार आता आपल्याला आपल्या घरी गेले पाहिजे असे त्यांना वाटू लागले आहे.

मात्र घरी जाण्याचे सर्व मार्ग तर बंद झालेल. अखेर राज्यशासनाने ज्यांना आपल्या राज्यात घरी परत जायचे आहे त्यांनी ऑनलाईन नोंदणी करावी असे आवाहन केले, मात्र दापोली शहरात राहणाऱ्या या परप्रांतीयांना दापोली नगरपंचायत कार्यालयात जा तेथे तुमच्या गावी जाण्याची व्यवस्था होईल असे सांगितल्यावर आज परप्रांतीय गोळा झाले व नगरपंचायत कार्यालयात येउन आमची गावी जाण्याची व्यवस्था करा अशी मागणी प्रशासनाकडे करू लागले, नागरपंचायतीचे मुख्याधिकारी महादेव रोडगे व पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी या सर्वांची समजूत काढली व गावी परत जाण्यासाठी काय काय करावे लागते याची पूर्ण माहिती दिली त्यानंतर समजूत पटल्यावर हे परप्रांतीय आपापल्या घरी परतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com