बनावट नोटांची छपाई करणारी टोळी अखेर जेरबंद

duplicate currency spread in market three people arrested by police in chiplun ratnagiri
duplicate currency spread in market three people arrested by police in chiplun ratnagiri
Updated on

चिपळूण (रत्नागिरी) : चिपळुणात बोगस नोटांची हुबेहूब छपाई करून त्या मुंबई, ठाणे येथे या नोटा वटविण्यासाठी गेलेल्या टोळीच्या म्होरक्याला ठाणे गुन्हे शाखा वागळे युनिट पाचने बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्या चौकशीतून इतर दोन साथीदारांच्याही मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. या त्रिकुटाकडून ८५ लाख ४८ हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या असून या आरोपींनी यापूर्वी बाजारात बनावट नोटा वटविल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. 

तसेच बनावट नोटा छापणारी मोठी टोळी कार्यरत असण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. चिपळूण येथील कळंबट गावात राहणारा सचिन आगरे याने गावातच प्रिंटर, स्कॅनर आणि कॉम्प्युटरच्या मदतीने बनावट नोटा छापण्याचा गोरखधंदा थाटला होता. या ठिकाणी त्याने दोन हजार रुपये दराच्या बनावट नोटा छापल्या. या नोटा सचिन वटविण्यासाठी येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखा वागळे युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना मिळाली.

त्यांनी गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत पवार, अनिल सुरवसे, भूषण शिंदे, सहायक पोलीस उपनिरीक्षक बाबू चव्हाण, निवृत्ती महांगरे, देविदास जाधव, पोलीस हवालदार राजेश क्षत्रिय, विजयकुमार गोव्हे, मनोज पवार, शिवाजी रायसिंग, दिलीप शिंदे, शशिकांत लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि टीमच्या मदतीने कापूरबावडी येथे सापळा रचला . 

या ठिकाणी नोटा घेऊन आलेल्या सचिन याला पोलीस पथकाने बेड्या ठोकल्या. सचिनला अटक करताच त्याचे साथीदार मन्सूर खान व चंद्रकांत माने या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. या तिघांकडून एकूण ८५ लाख ४८ हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. चलनात आलेल्या नव्या नोटा बनावट पद्धतीने छापून वटविणाऱ्या अनेक टोळ्या आतापर्यंत जेरबंद करण्यात आल्या आहेत.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com