राजापूर : दरडी आणि माती कोसळण्याचे प्रकार यावर्षी पावसाळ्याच्या प्रारंभाला झाले आहेत. गेल्या दोन दिवसांमध्ये घाटमार्गात रस्त्यावर काही छोट्या दगडी आल्या; मात्र सुदैवाने वाहतुकीसाठी रस्ता बंद झालेला नाही. धोकादायक दरडी आणि संभाव्य भूस्खलन पाहता आंबा घाटानंतर (Amba Ghat) रत्नागिरी जिल्ह्यातील पश्चिम महाराष्ट्राच्या प्रवासाची भिस्त असलेला अणुस्कुरा घाटमार्गही (Anuskura Ghat) प्रवासाच्यादृष्टीने धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे अणुस्कुरा घाटमार्गातील प्रवास निर्धोक ठेवण्याचे आव्हान बांधकाम विभागासमोर ठाकले आहे.