esakal | सिंधुदुर्गातील  "तो' हादरा भूकंपाचाच 
sakal

बोलून बातमी शोधा

Earthquake In Sindhudurg Tahalisdar Clears Humor

तालुक्‍यातील ओटवणे, कारिवडे, चराठे, माडखोल, केसरी आदी सह्याद्रीच्या पट्ट्यात काल रात्री 8 वाजून 51 मिनिटांनी जमिन हलल्यासारखा प्रकार घडला. अनेकांना याची जाणीव झाली.

सिंधुदुर्गातील  "तो' हादरा भूकंपाचाच 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - तालुक्‍यातील सह्याद्री पट्ट्यातील गावांना बुधवारी (ता. 14) रात्री जाणवलेला तो हादरा भूकंपाचा होता. त्याचा केंद्रबिंदू हा सातारा कोयना धरण परिसरातील असुन तसा अहवाल जिल्ह्याला प्राप्त झाल्याचे तहसिलदार राजाराम म्हात्रे यांनी सांगितले; मात्र कोयनेतील भूकंपाची तीव्रता ही 2.9 रिश्‍टर स्केल इतकी असल्याने आणि त्याचा धक्का याठिकाणी जाणवणे हे एकप्रकारे आश्‍चर्यच असल्याचेही त्यांनी सांगितले. 

तालुक्‍यातील ओटवणे, कारिवडे, चराठे, माडखोल, केसरी आदी सह्याद्रीच्या पट्ट्यात काल रात्री 8 वाजून 51 मिनिटांनी जमिन हलल्यासारखा प्रकार घडला. अनेकांना याची जाणीव झाली. कारिवडे भागात आवाज होऊन जमिन हालली. त्यामुळे हा नेमका प्रकार भुकंप की अन्य दगड खाणीवरील ब्लास्टींग याबाबत लोकांमध्ये संभ्रमावस्था होती. 

याबाबत तहसिलदार म्हात्रे यांना विचारले असता, ते म्हणाले, "घडलेला प्रकार हा भुंकप आहे. त्याचा केंद्रबिंदू हा कोयना धरण परिसरातील आहे. कोयना धरण परिसरात रात्री भूकंपाचा धक्का बसला. त्याचा अहवाल जिल्ह्याला प्राप्त झाला आहे. या भुकपांची तीव्रता 2.9 रिश्‍टर स्केल इतकी दाखविली आहे. या भुकंपाचा हादरा किती किलोमिटरपर्यत बसला हे समजू शकले नाही.'' 

ते पुढे म्हणाले, ""हा हादरा एखाद्या दगड खाणीवरील ब्लास्टिगचा असण्याची शक्‍यता असल्याने आज नायब तहसिलदार प्रदिप पवार यांच्यासह मंडळ अधिकाऱ्यांची टीम बांदा, कारिवडे, केसरी या भागातील दगड खाणीवर पाहणी केली; मात्र असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तेथील लोकांच्या म्हणण्यानुसार दोन वर्षापुर्वी असाच प्रकार घडला होता. केसरी येथील काही जणांनी रात्री बसलेल्या धक्‍क्‍याने घरातील भांडी खाली पडली असे सांगितले. त्यामुळे हा प्रकार कोयना येथील भुंकपाचाच असु शकतो.'' 

"" तिलारी येथील भुकंप मापन यंत्र बंद आहे; मात्र आपण आज स्वतः त्याठिकाणी जाऊन तेथील लोकांकडून माहीती घेतली. तेथे कोणालाही भूकंपाचा हादरा जाणवला नाही. कोयना येथील भूकंपाचा हादरा येथे जाणवू शकतो.'' 
- बाळासाहेब आजगेकर, सहाय्यक अभियंता, तिलारी पाटबंधारे विभाग