Deepak Kesarkar
Deepak Kesarkaresakal

'मालवणमध्ये 100 फुटाचा शिवपुतळा उभारल्यास PM मोदींना पुन्हा निमंत्रित करता येईल'; काय म्हणाले केसरकर?

Deepak Kesarkar : राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा काल दुपारी कोसळला.
Published on
Summary

''पुतळा कोसळला हा एक अपघात आहे. वाईटातून काहीतरी चांगले घडायचे असेल त्यासाठी हा अपघात घडला असेल. अपघात कसा घडला याची चौकशी शासनाकडून होईल.''

मालवण : छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj Collapse Statue) नौदलने (Indian Navy) उभारलेला पुतळा अपघातग्रस्त बनला आहे ही एक दुर्घटना आहे. काहीतरी चांगले घडायचे असेल, त्यामुळे हा अपघात घडला असेल. मात्र, येत्या काळात अरबी समुद्रात नव्हे तर मालवणातच स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या धर्तीवर १०० फुटाचा छत्रपतींचा पुतळा उभारल्यास तीच खरी महाराजांना आदरांजली ठरेल. यासाठी शिवप्रेमींचा प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी करणार आहे, असे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी आज येथे सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com