ब्रेकिंग - सिंधुदुर्गात सापडले आठ कोरोना पॉझिटिव्ह..

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज नव्याने आठ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.

ओरोस  : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज नव्याने आठ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता १६ झाली आहे. यातील पाच रुग्ण कोरोना मुक्त होवून घरी परतले आहेत. परिणामी आता कोरोना एक्टिव रुग्ण ११ राहणार आहे.

हेही वाचा- रत्नागिरी, खेड, दापोली मार्गावर धावली लालपरी ....असे आहे नियोजन..

  यातील कणकवली डांबरे येथील चार, कणकवली ढालकाठी येथील २, मालवण हेवाळे येथील १ व वैभववाडी नाधवडे येथील १ असे नवीन आठ रुग्ण सापडले आहे. एकाच दिवशी आठ रुग्ण सापडल्याने जिल्हा प्रशासन हादरले असून जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eight corona positive patient found in Sindhudurg