आठ फुटी अजगराला सर्पमित्रांनी दिले जिवनदान

pali.
pali.

पाली - सुधागड तालुक्यातील बलाप येथील पोल्ट्री फार्ममध्ये एक आठ फुटी अजगर घुसला होता. पालीतील सर्पमित्रांनी या अजगराला पकडून बुधवारी (ता.२४) जंगलात सुखरुप सोडून जिवनदान दिले.

पावसाळा सरला असुन वातावरणात उष्मा वाढला आहे. त्यामूळे साप अाणि इतर सरपटणारे थंडाव्यासाठी व प्रामुख्याने शिकारीसाठी मानवी वस्ती, भात गोदामे व पोल्ट्री फार्म अादि ठिकाणी सर्रास दिसतात. बलाप येथील संदिप खरिवले यांच्या पोल्ट्रीफार्मवर अजगर आला असल्याची माहिती सर्पमित्र रोशन ठोंबरे व नरेश मोहिते यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी अजगराला पकडून जंगलात सोडले. सर्पमित्र रोशन ठोंबरे म्हणाले की मनुष्याप्रमाणे सृष्टीतील प्रत्येक प्राणिमात्रांना जगण्याचा अधिकार आहे. या मुक्या जनावरांना जिवनदान देणे हे सर्पमित्र, पर्यावरणप्रेमींसह सर्वांचेच काम आहे. सर्प दिसला तर त्यास न मारता सर्पमित्रांना बोलवून त्यास जिवनदान द्यावे असे आवाहन रोशन ठोंबरे यांनी केले. तर सर्पमित्र नरेश मोहिते म्हणाले की आजवर अनेक विषारी व बिनविषारी सापांना पकडून सुखरुप जंगलात सोडण्याचे काम अाम्ही केले आहे. शासनाकडून आम्हाला सर्पमित्राचे अधिकृत ओळखपत्र दिले जावेत.

बर्याच वेळा सापांबद्दल असणारे गैरसमज, अंधश्रद्धा अाणि भिती यामुळे त्यांना सर्रास मारले जाते. मात्र सापांना न मारता जवळच्या सर्प मित्रांना बोलवावे जेणेकरुन सापांचे प्राण वाचतील. साप शेतातील उपद्रवी उंदीर खातात त्यामुळे ते शेतकर्यांचे मित्र आहेत.
नरेश मोहिते, सर्पमित्र, पाली-सुधागड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com