
भोस्ते घाट आणि अपघात हे समीकरण बनले आहे. भोस्ते घाटातील अवघड वळणावर अनेक अपघात होत असून, या अपघातात अनेक जणांना प्राणास मुकावे लागत आहे.
खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa Highway) भोस्ते घाटात अपघाताचे (Bhoste Ghat Accident) सत्र कायम असून, रविवारी ट्रक, मोटार व अन्य एक ट्रक व दुचाकी अशा चार वाहनांमध्ये झालेल्या विचित्र अपघातात ट्रकमधील दोघे व मोटारीतील सहा जण गंभीर जखमी झाले. अपघात रविवारी (ता. २३) दुपारी बाराच्या सुमारास झाला. संस्कृती संतोष कदम (वय ४२), जागृती वैभव शिंदे (३५), शोभा सदानंद कदम (६०), संतोष एकनाथ कदम (५१), मयुरी सदानंद कदम (३०) व जयराम वैभव सुर्वे (१४, सर्व रा. मुंबई) अशी मोटारीतील जखमी झालेल्या प्रवाशांची नावे आहेत.