
कणकवली : ‘‘पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे देशात दुखवटा होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौरा अर्धवट सोडून पाकिस्तानविरोधात काही कठोर निर्णय घेण्यासाठी भारतात परतले. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जबाबदारीचे भान विसरून वागले. कुडाळमध्ये आभार सभा घेऊन त्यांनी हार, तुरे स्वीकारत फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला,’’ असा आरोप शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते माजी खासदार विनायक राऊत यांनी शनिवारी येथे केला.