Kokan: खरीप हंगामावर एल निनोचं सावट, कृषी विभागाचा इशारा; योग्य वाण निवडा अन् सिंचन योजनेचा लाभ घ्या

El Nino Threat Looms Over Kharif Season: पावसाचा विलंब, कमी पर्जन्यमान आणि पिकांवरील ताण टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी योग्य वाणांची निवड करून सिंचन योजनांचा लाभ घ्यावा, असे कृषी विभागाने आवाहन केले आहे.
Kokan

Kokan

esakal

Updated on

सिंधुदुर्गनगरी: जागतिक हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर यंदा 'एल निनो' सक्रिय होण्याची दाट शक्यता असून, याचा थेट परिणाम भारतीय मॉन्सूनवर होण्याची चिन्हे आहेत. पॅसिफिक महासागरातील तापमानवाढीमुळे मॉन्सून कमकुवत होऊन पावसाचे आगमन उशिरा होणे, पावसाच्या दोन सत्रात मोठा खंड पडणे किंवा एकूण पर्जन्यमान कमी राहणे, असे परिणाम जाणवू शकतात.

सिंधुदुर्ग जिल्ह्याला अतिवृष्टीचा इतिहास असला, तरी या संभाव्य आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी शेतकऱ्यांनी आतापासूनच मूलस्थानी मृद व जलसंधारणाच्या व इतर उपाययोजना कराव्यात, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com