
कणकवली ( सिंधुदुर्ग ) - भाजपच्या जिल्हा परिषद सदस्यांमध्ये कोणतीही नाराजी नाही. ठरलेल्या फॉर्म्युल्याप्रमाणेच जिल्हा परिषद सभापती निवड झाली. उपाध्यक्षपद हे भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांकडे असेल, असा दावा भाजपचे प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी आज येथे केला.
ज्यावेळी राणे समर्थकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षपद आणि चार सभापतीपदे राणे समर्थकांना दिली जातील तर उपाध्यक्षपद हे भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांकडे असेल असा फॉर्म्युला ठरला होता. त्यानुसारच निवड प्रक्रिया झाली आहे. त्यामुळे भाजपच्या जिल्हा परिषद सदस्यांमध्ये कोणतीही नाराजी नाही. पुढील वर्षी होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत मात्र नवा-जुना असा फॉर्म्युला नसेल तर सर्व भाजपचे उमेदवार असतील आणि कुणाला पद द्यायचे हे भाजपचे वरिष्ठ नेते ठरवतील, असे श्री.जठार म्हणाले.
राज्यातील आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे एक-एक प्रताप बाहेर पडत आहेत. निलंबित अधिकारी सचिन वाझे यांचे कारनामे आणि वाझेंचे बोलविता धनी सरकारमधील मंत्रीच असल्याचीही शक्यता पुढे येत आहे. त्यामुळे अतिशय प्रामाणिक असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडी सरकार बरखास्त करण्याची शक्यता आहे, असे दावाही श्री. जठार यांनी आज येथे केला.
श्री. जठार यांनी येथील भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, ""आघाडी सरकारमधील मंत्र्यांवरच कायदे लावायची वेळ आली आहे. एका मंत्र्यामुळे युवतीला आत्महत्या करावी लागते तर दुसऱ्या मंत्र्यावर एका महिलेकडून आरोप केला जातो. याखेरीज खुद्द मुंबईच्या तत्कालीन आयुक्तांनीही राज्याच्या गृहमंत्र्यांवर आरोप केला आहे. याखेरीज आणखीही काही मंत्र्यांचे प्रताप पुढील काळात उघडकीला येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आघाडी सरकार बरखास्त करण्याशिवाय कोणताही पर्याय राहिलेला नाही.''
लॉकडाऊनला तीव्र विरोध
आघाडी सरकारला लॉकडाऊन करायचंच असेल तर प्रत्येक गरिबांच्या खात्यामध्ये किमान 10 हजार रुपये द्यायला हवेत. प्रत्येकाच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था सरकारने करायला हवी. तसे न करता लॉकडाऊन झाले तर राज्यातील भाजप रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशारा प्रमोद जठार यांनी दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.