ऑक्टोबरपासून महाड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकांची रणधुमाळी

सुनील पाटकर
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

महाड : ऑक्टोबर 2018 ते एप्रिल 2019 या कालावधीत मुदत संपणाऱ्या रायगड जिल्ह्यातील 240 ग्रामपंचायतींच्या निवडणूकांची रणधुमाळी आता सुरू होणार आहे. यासाठी 9 ऑगस्टला अंतिम प्रभाग रचना जाहिर करण्यात आली आहे. 

महाड : ऑक्टोबर 2018 ते एप्रिल 2019 या कालावधीत मुदत संपणाऱ्या रायगड जिल्ह्यातील 240 ग्रामपंचायतींच्या निवडणूकांची रणधुमाळी आता सुरू होणार आहे. यासाठी 9 ऑगस्टला अंतिम प्रभाग रचना जाहिर करण्यात आली आहे. 

ऑक्टोबर 2018 ते एप्रिल 2019 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका टप्प्याटप्प्याने जाहिर होणार आहेत. 2019 ला लोकसभा व विधानसभा निवडणूकांचे बिगुल वाजणार असल्याने या दरम्यान होणा-या या निवडणूकांना राजकियदृष्ट्या महत्व प्राप्त झाले आहे. जिल्ह्यातील काँग्रेस, शेकाप, शिवसेना , राष्ट्रवादी काँग्रेस त्याचबरोबर भाजपने त्या दृष्टीने राजकिय व्युहरचना आखण्यास सुरूवात केली आहे. या निवडणूकांसाठी प्रभागरचना करण्याचे काम पूर्ण झाले आहे.त्यामुळे इच्छीकही आता कामाला लागले आहेत. नव्या नियमानुसार सरपंच पदाची निवडणूकही थेट पद्धतीने होणार असल्याने सक्षम उमेदवाराची शोधात राजकिय नेते आत्तापासूनच लागले आहेत. 

अलिबाग तालुक्यातील थळ, आंबेपूर, पोयनाड, पोलादपूरमधील माटवण, देवळे, श्रीवर्धनमधील हरिहरेश्वर, बोर्लीपंचतन, म्हसळ्यातील खामगाव, मेंदडी, महाडमधील तेटघर, सव, रेतवळे, कांबळे, विन्हेरे, वलंग, आमशेत, रोहा तालुक्यातील धाटाव, कोलाड, आंबेवाडी, माणगाव तालुक्यातील निजामपूर, तळाशेत, अशा महत्वाच्या ग्रामपंचायतींचा यामध्ये समावेश असल्याने आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नेतेही याकडे लक्ष देऊन आहेत.

तालुके व निवडणूका होणाऱ्या ग्रामपंचायती
अलिबाग - 34, मुरूड - 4, पेण - 17, पनवेल - 18, उरण - 8, कर्जत - 23, खालापूर - 4, माणगाव - 21, तळा - 18, रोहा - 28, सुधागड - 6, महाड - 30, पोलादपूर - 4, श्रीवर्धन - 6, म्हसळा - 9. 

मुदत संपत असणा-या ग्रामपंचायतींची 9 ऑगस्टला अंतिम प्रभाग रचना जाहिर झाली असुन त्यांची प्रत ग्रामपंचायतींना प्रदर्शित करण्यासाठी देण्यात आलेली आहे.
- प्रदीप कुडळ, नायब तहसिलदार, महाड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: election starts from October of grampanchayat of mahad district