जिल्ह्यात २०२४ मध्ये मुदत संपलेल्या २८, तर २०२५ मध्ये मुदत संपणाऱ्या १५० सहकारी संस्था आहेत. त्यांच्या निवडणुका २०२५ मध्ये होतील.
ओरोस : यावर्षी सहकार क्षेत्रातील राजकारण तापणार आहे. तब्बल १७८ सहकारी संस्थांच्या निवडणुका (Cooperative Elections) होणार असून यात २०२४ मध्ये पंचवार्षिक मुदत संपलेल्या २८ तर २०२५ मध्ये मुदत संपणाऱ्या १५० सहकारी संस्थांचा समावेश आहे.