हत्ती पुन्हा परतले; बांबर्डेत मोठे नुकसान

प्रभाकर धुरी
Monday, 25 January 2021

गेले काही महिने हत्तींचा उपद्रव तिलारी खोऱ्यात नसल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला होता; पण हत्तींचे पुनरागमन झाल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांमध्ये भीती आणि दहशतीचे वातावरण आहे.

साटेली भेडशी (सिंधुदुर्ग) - तिलारी खोऱ्यातील बांबर्डेत दोन हत्तींचे काल (ता. 23) रात्री पुनरागमन झाले. त्यांनी शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान केले. गेले काही महिने हत्तींचा उपद्रव तिलारी खोऱ्यात नसल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला होता; पण हत्तींचे पुनरागमन झाल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांमध्ये भीती आणि दहशतीचे वातावरण आहे. 

दोडामार्ग कोल्हापूर मार्गालगत असलेल्या बांबर्डेत हत्तींनी प्रवेश करुन केळीच्या बागा, सुपारीची झाडे, मका व अन्य पिकांचे नुकसान केले. तेथील सत्यवान रामा गवस यांच्या सुमारे 100 केळी, सुपारी आणि मका पिकाचे हत्तींनी नुकसान केले. विठ्ठल गवस, मनोहर गवस, हनुमंत गवस, वासुदेव गवस यांच्या केळी व अन्य पिकांचे नुकसान हत्तींनी केले. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the elephant came again bambarde konkan sindhudurg