दोडामार्ग तालुक्यात टस्कराची दहशत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 मे 2019

दोडामार्ग - तिलारी खोऱ्यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान करून शेतकऱ्यांना मेटाकुटीस आणणाऱ्या जंगली हत्तींचा कळप घोडगेवाडीत स्थिरावला आहे. घोडगेवाडीचे उपसरपंच भालचंद्र कुडव यांचा या कळपातील टस्कर हत्तीने हल्ला करण्याच्या दृष्टीने थरारक पाठलाग केला. यावेळी कुडव यांनी जीव वाचवण्यासाठी कालव्यातील पाण्यात उडी मारल्याने ते बालबाल बचावले. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. ही घटना सोमवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान घडली.

गेल्या काही महिन्यांपासून तिलारी खोऱ्यात जंगली हत्तींचा धुमाकूळ सुरू आहे. दर दिवशी कोट्यवधी रुपयांचे नुकसान या हत्तींकडून सुरू असते. त्यामुळे घाटीवडे, बांबर्डे, वीजघर, मुळस, हिवाळे, तेरवण-मेढे, सोनावल या भागातील शेतकरी, बागायतदार व ग्रामस्थ मेटाकुटीस आले आहेत. या कळपात टस्कर हत्तींचा देखील समावेश आहे.

आतापर्यंत दोघांना या टस्करांनी हल्ला करून जखमी केले आहे. हत्ती संकटामुळे तिलारी खोऱ्यातील शेतकरी भीतीच्या सावटाखाली वावरत आहे. गेले दोन दिवस हा कळप सोनवालमध्ये होता. आज या कळपाने घोडगेवाडीच्या दिशेने आपला मोर्चा वळविला आणि सायंकाळी गावातून गेलेल्या तिलारी प्रकल्पाच्या उजव्या कालव्याच्या परिसरात जाऊन स्थिरावला. 

यावेळी या कळपातील टस्कराने घोडगेवाडीचे उपसरपंच भालचंद्र कुडव यांच्यावर हल्ला चढविण्याच्या उद्देशाने पाठलाग केला. श्री. कुडव यांनी जीव वाचवण्यासाठी प्रसंगावधान राखत कालव्यात उडी मारली. त्यामुळे त्यांचा जीव वाचला.

वनविभागाचे कर्मचारी दाखल
वनविभागाचे कर्मचारी घोडगेवाडी परिसरात दाखल झाले असून हत्तींना हुसकावण्यासाठी उपाययोजना करीत आहेत. ग्रामस्थांनी हत्ती स्थिरावलेल्या क्षेत्रात जाऊ नये, असे आवाहन वनविभागाने केले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Elephant damage farms in Dodamarg taluka