

Cashew farmers in Sawantwadi
sakal
सावंतवाडी : काजू उत्पन्नावर आमच्या परिसरातील शेकडो कुटुंबांचे वर्षभराचे अर्थकारण चालते. आता काजू गोळा करण्याच्या हंगामातच बागामध्ये हत्तींनी ठाण मांडल्यामुळे उत्पन्न झाडाखाली सडून जात आहे, मग आम्ही पुढचे वर्षभर कुटुंब चालवायचे कसे?, असा संतप्त सवाल करत आमच्या पंचक्रोशीतून चार दिवसांत हत्तीना हटवा, अन्यथा आम्ही वन विभागासमोर ठाण मांडू, असा निर्वाणीचा इशारा कोलझर-तळकट दशक्रोशीतील शेतकऱ्यांनी येथील वन विभागाला दिला.