हत्तीच्या कळपात दोन लहान पिल्ले असल्याने त्यांच्या बचावासाठी हत्ती आक्रमक रुप धारण करण्याची दाट शक्यता आहे. यातील टस्कर अधिक आक्रमक आहे.
दोडामार्ग : हत्तींचा (Elephants) धुडगूस आता दिवसाढवळ्या वस्तीपर्यंत पोहोचला आहे. मोर्ले येथे टस्कराने आज सकाळीच थेट वस्तीत घुसून दहशत निर्माण केले. या प्रकाराने गावात भीतीचे सावट पसरले आहे.