
हत्ती प्रामुख्याने मोर्ले, केर या परिसरात स्थिरावले होते. या भागात त्यांच्याकडून नुकसानसत्र सुरू होते. गेले पंधरा-वीस दिवस हत्ती कोठे गेले, याबाबत संभ्रम होता. ते परत फिरल्याची शक्यता वर्तवली जात होती.
दोडामार्गः तब्बल पाच हत्तींचा कळप तालुक्यातील बागायती क्षेत्राचा कोअर एरिया असलेल्या शिरवल परिसरात दाखल झाला आहे. ऐन काजूच्या हंगामात आलेल्या या हत्तींमुळे दहशत निर्माण झाली आहे. या हत्तींना (Elephant) मागे न परतवल्यास करोडोंचे नुकसान होण्याची भीती आहे. या परिसरात तिसऱ्यांदा हत्ती दाखल झाले आहेत.