सावधान ! मालवणात अकरा कोरोना पॉझिटिव्ह 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 15 September 2020

आज ग्रामीण रुग्णालयात 42 जणांचे स्वॅब घेण्यात आले. यात 11 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 31 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज सापडलेल्या रुग्णांमध्ये शहरातील डॉक्‍टर बहीण, भाऊ, एक पोलिस कर्मचारी यांचा समावेश आहे.

मालवण ( सिंधुदुर्ग) - येथील ग्रामीण रुग्णालयात आज करण्यात आलेल्या तपासणीत 11 कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यात शहरात 5 तर ग्रामीण भागात 6 रुग्ण सापडले आहेत. ही माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांनी दिली.

आज ग्रामीण रुग्णालयात 42 जणांचे स्वॅब घेण्यात आले. यात 11 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 31 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज सापडलेल्या रुग्णांमध्ये शहरातील डॉक्‍टर बहीण, भाऊ, एक पोलिस कर्मचारी यांचा समावेश आहे.

शहरातील गवंडीवाडा येथील 1, मेढा येथील 1, धुरीवाडा येथील 1, पालिकेसमोर 2, मसुरे येथील 1, कुंभारमाठ येथील 4, कुडाळ येथील 1 रुग्णाचा समावेश असल्याची माहिती आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eleven Corona Positive In Malvan Be Alert Sindhudurg