श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

अमित गवळे
रविवार, 21 जुलै 2019

पाली :  श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात कामगिरी बजावणाऱ्या अधिपरीचारक अक्षय अजित कांबळे यांना शनिवारी (ता.20) रात्री नऊच्या सुमारास जातीवाचक शिवीगाळ व मारहाण  करण्यात आली. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयातील 38 कर्मचाऱ्यांनी रविवारी (ता.21) दिवसभर काम बंद आंदोलन करून धरणे धरले होते. त्यामुळे येथील आरोग्यसेवा कोलमडली होती. 

पाली :  श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात कामगिरी बजावणाऱ्या अधिपरीचारक अक्षय अजित कांबळे यांना शनिवारी (ता.20) रात्री नऊच्या सुमारास जातीवाचक शिवीगाळ व मारहाण  करण्यात आली. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयातील 38 कर्मचाऱ्यांनी रविवारी (ता.21) दिवसभर काम बंद आंदोलन करून धरणे धरले होते. त्यामुळे येथील आरोग्यसेवा कोलमडली होती. 

श्रीवर्धन पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार श्रीवर्धन नवी पेठेतील समीर सत्यवान थळे याने प्रशांत केतकर यास रक्तदाबाचा त्रास होत असल्याने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात आणले होते. तेव्हा रुग्णालयात नियोजित कामगिरीवरील डॉक्टरांनी प्रशांत केतकर यांच्यावर प्राथमिक उपचार केले. त्या प्रसंगी सरकारी रुग्णालयातील नियमा नुसार रुग्ण नोंदणी पेपर चे रुपये 10 शुल्काची मागणी तक्रारदार अक्षय कांबळे यांनी समीर थळे व संतोष तांडेल याच्याकडे केली. त्याचा राग मनात धरून सत्यवान थळे, समीर थळे, देवेंद्र भुसाने व एक अज्ञात व्यक्ती यांनी तक्रारदार अक्षय अजित कांबळे यांना जाती वाचक शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच त्याच्या गळ्यातील चांदीची 3 तोळा अंदाजे मूल्य 1000 रुपयांची चैन हिसकावून घेतली व त्यांच्याकडील मोबाईल चे नुकसान केले.  

रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या तक्रारी नुसार श्रीवर्धन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे त्यानुसार  समीर सत्यवान थळे,  देवेंद्र भुसाने व संतोष तांडेल यांना अटक करण्यात आली आहे. तसेच मुख्य आरोपी सत्यवान पंढरीनाथ थळे फरार झाला आहे. या सर्वांवर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. 

मारहाण प्रकरणामुळे रविवारी  दिवसभर श्रीवर्धन तालुक्यातील सरकारी आरोग्य सेवा विस्कळीत झाली होती. तसेच अत्यावश्यक रुग्णांना डॉ. मधुकर ढवळे यांनी सेवा देऊन रुग्णांची गैरसोय होऊ दिली नाही. 

सत्यवान पंढरीनाथ थळेची गुन्हेगारी पार्श्वभूमी
श्रीवर्धन मधील मटका किंग व झुगार क्षेत्रातील सत्यवान थळे हे नावाजलेले नाव आहे. पोलीस प्रशासनात थळे ने जवळपास 20 वर्ष नोकरी केली त्याच्या गैरवर्तनामुळे पोलीस प्रशासनाने त्याला सक्तीने सेवा निवृत्त केले. त्यानंतर सत्यवान थळे याने श्रीवर्धन गुन्हेगारी क्षेत्रात आपला ठसा उठवला. श्रीवर्धन पोलीस ठाण्यात विविध गुन्ह्यामध्ये थळेचा सहभाग उघड झाला आहे. आज त्याच्या पावलावर पाऊल ठेवत त्याचा मुलगा समीर सत्यवान थळे गुन्हेगारी क्षेत्रात कार्यरत आहे. मारामारी, माहिती अधिकार कायद्याचा गैरवापर व खोटी उपोषणे हे थळे याचे नित्याचे प्रकार झाले आहेत .


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Employes protest in Shrivardhan district Hospital