'आता शिवसेना एके शिवसेना हाच उद्देश'

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 15 November 2020

एमआयडीसीमध्येदेखील लक्ष घालून तरुणांना जास्तीत जास्त रोजगार मिळवून देण्यासाठी जिल्हाप्रमुख सचिन कदम यांना बरोबर घेऊन प्रयत्न करणार

चिपळूण (रत्नागिरी) : आता तरुणांच्या रोजगारावर लक्ष द्यायचे आहे. गुहागर येथे प्रस्तावित एमआयडीसीसाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेणार आहे. खेड एमआयडीसीमध्येदेखील लक्ष घालून तरुणांना जास्तीत जास्त रोजगार मिळवून देण्यासाठी जिल्हाप्रमुख सचिन कदम यांना बरोबर घेऊन प्रयत्न करणार आहे, असे प्रतिपादन आमदार भास्कर जाधव यांनी केले.

तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी कोंढे रिगल हॉल येथे मेळावा आयोजित केला होता त्यावेळी ते बोलत होते. तालुक्‍यातील कोंढे येथे शिवसेनेकडून गुहागर विधानसभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या ७२ गावांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी कामाला लागा, असे आदेश यावेळी जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी दिले.  

हेही वाचा - अजूनही सांघिक खेळ मैदानापासून दुरच ; खेळाडूंचे वर्ष मात्र वाया -

कदम म्हणाले, आघाडी आहे, नाही, होणार की नाही, याची चिंता न करता शिवसेना एके शिवसेना हाच उद्देश ठेवून पुढील ग्रामपंचायती आणि सर्व निवडणुकांसाठी तयारीला लागा. नवा-जुना वाद घालत बसू नका. आपल्याला १०० ग्रामपंचायतींवर भगवा फडकवायचा आहे. यावेळी सभापती धनश्री शिंदे, अनुजा चव्हाण, शरद शिगवण यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

१०० टक्के यश खेचून आणा

तालुकाप्रमुख संदीप सावंत म्हणाले, जाधवांसारखे नेतृत्व पाठीशी उभे राहिल्याने आता थांबणार नाही. एकेक कार्यकर्ता जोडून सर्वांना बरोबर घेऊन १०० टक्के यश खेचून आणू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: for employment generation with the help of MIDC visit to industrial minister subhash desai said bhaskar jadhav in ratnagiri chiplun