Dapoli Encroachment Crime
sakal
दापोली - शहरातील मुख्य रस्त्यालगत वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या अनधिकृत टपऱ्या व खोक्यांवर अखेर दापोली नगरपंचायतीने मंगळवारी थेट जेसीबी फिरविला. केळसकर नाका ते जालगाव पेट्रोल पंप तसेच केळसकर नाका ते दापोली एसटी स्थानक या प्रमुख मार्गांवरील अतिक्रमणांवर झालेल्या या कारवाईमुळे शहरातील रस्ते आणि पादचारी मार्ग मोकळे होण्यास सुरुवात झाली. नगरपंचायतीने कारवाईपूर्वी वारंवार नोटिसा देऊनही अतिक्रमणे न हटविणाऱ्या व्यावसायिकांवर अखेर प्रशासनाने कठोर भूमिका घेतली.