चार दिवसापूर्वी दिला नोकरीचा राजीनामा अन् त्याने उचलेले हे पाऊल

Engineer Youth Suicide Incidence In Asniye Sawantwadi
Engineer Youth Suicide Incidence In Asniye Sawantwadi
Updated on

बांदा ( सिंधुदुर्ग ) - असनिये-कणेवाडी येथील मिलिंद नंदकिशोर ठिकार (वय 28) याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मिलिंद हा इंजिनिअर असल्याने बंगळूरू येथील आयटी कंपनीत मोठ्यापदावर नोकरीस होता. लॉकडाउन असल्याने तो गेले काही दिवस घरातूनच काम करत होता. चार दिवसांपूर्वीच त्याने नोकरीचा अचानक राजीनामा दिला. आज सकाळी त्याने आईला काकांच्या घरी ठेवलेला लॅपटॉप आणण्यासाठी पाठविले होते. त्यावेळी घरात इतर कोणीही नव्हते. 

आई लॅपटॉप घेऊन घरी परतल्यावर मिलिंद याने दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. आईने हंबरडा फोडल्याने शेजाऱ्यांनी धाव घेतली. मिलिंदला खाली उतरविण्यात आले; मात्र त्यापूर्वीच त्याचे निधन झाले होते. वर्षभरापूर्वीच मिलिंदच्या वडिलांचे निधन झाले होते. वडिलांचे श्राद्ध घालण्यासाठी आलेल्या एकुलत्या मिलिंद याने आत्महत्या केल्याने आईला मोठा धक्का बसला. असनिये पोलीस पाटील विनायक कोळापटे यांनी बांदा पोलिसांना खबर दिली. हवालदार विकी गवस व विठोबा सावंत यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Ratnagiri food safety raid on fake paneer
Mumbai Goa Highway landslide update
MNS threatens protest in Sudhagad Taluka against the installation of smart meters by Mahavitaran
ANS (Andhashraddha Nirmulan Samiti) and women's organizations in Pen organize 'Vatsavitri te Vatdharitri' campaign for tree plantation
Marathi News Esakal
www.esakal.com