कोकण : मंडणगडच्या 52 गावांत कोरोनाची एंट्री

ग्रामीण भागात रुग्ण वाढले; टाकेडे गावाने घेतला गाव क्वारंटाईनचा निर्णय
कोकण : मंडणगडच्या 52 गावांत कोरोनाची एंट्री

मंडणगड (रत्नागिरी) : कोरोना महामारीच्या पहील्या टप्यात वर्षभर सुरक्षित राहीलेल्या मंडणगड तालुक्यास कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा चांगलाच फटका बसत आहे. एप्रिल महिन्याच्या पहील्या पंधरा दिवसांत कोरोना संसर्गाच्या प्रमाणात वाढ झाली असून ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केला आहे. 1 मार्च 15 एप्रिल 2021 अखेर तालुक्यात एकूण 58 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यात ग्रामीण भागातही कोरोना संसर्ग वाढल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. आतापर्यंत ५२ गावांतून कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. या कालावधीत कोरोनामुळे मृत झालेल्याची आकडेवारीही वाढली आहे. या पार्श्वभुमीवर टाकेडे या गावाने स्थानीक पातळीवर उपायोयजना करताना संपुर्ण गाव क्वारंटाईन केले आहे. तसेच आरोग्य विभागामार्फत बाधीतांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहीती घेत तपासण्या करण्यावर भर देण्यात आला आहे.

कोरोना संसर्गाच्या पहील्या टप्यात कार्यरत झालेली ग्राम व वाडी कृती दल गेल्या काही महिन्यांपासून निष्क्रीय झालेली दिसून येत आहे. सुरुवातीच्या काळात या कृती दलाने प्रचंड जागरूकता दाखवली होती. मात्र गेल्या सप्टेंबर महिन्यात स्थानीक पातळीवर कोरोनाचे प्रमाण नगण्य होवू लागल्याने कृती दलाची सतर्कता कमी झाली. कोरोना नियमावलीचे पालन करीत संसर्गापासून दुर राहण्यासाठी कृती दले पुन्हा एकदा कार्यरत होण्याची आवश्यकता या निमीत्ताने व्यक्त होत आहे. लसीकरणाची मोहीम तीव्र करण्यासाठी यंत्रणेने कृती दल पुन्हा कार्यरत करण्यासाठी पावले उचलेली दिसून आली आहेत.

जनता करफ्यु लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी

शहरातील बाजारपेठेत आज भाजी, दुध व औषधे या जीवनावश्यक वस्तु वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. मंडणगड प्रभारी पोलीस निरिक्षक सुशांत वराळे व बाणकोट सागरी पोलीस स्थानकाचे पोलीस निरिक्षक उत्तम पिठे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व मुख्य नाकात व गर्दी असलेल्या चौकात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तरी आवश्यक कामासाठी दुचाकी, तीन चाकी व खाजगी गाड्यातून शहरात येणाऱ्या संख्या लक्षणीय असल्याने शहरात अनावश्यक कामासाठी फिरणाऱ्यांची सक्तीने कोरोना चाचणी सुरु करण्याची आवश्यकता व्यक्त झाली आहे. दरम्यान बाहेरुन तालुक्यात दाखल होणाऱ्यांना बंधन घालता यावे या उद्देशाने म्हाप्रळ, कादवण व वेसवी फेरी बोट या ठिकाणी तपासणी नाके कार्यान्वीत करण्यात आले आहेत. महसुल प्रशासनाने नगरपंचायतीने या कालवधीत कोणत्या उपाय योजना कराव्यात यासाठी नगरपंचायत कार्यालयात सभा घेतल्याचे दिसून आले. प्रतिबंधाचे लसीकरणाचे मोहीमेनेही गती पकडल्याचे आज दिसून आले.

"कोरोनाबाधीत झालेल्या व्यक्तीच्या संसर्ग कारणांचा अभ्यास केला असता पुणे, मुंबई येथून आलेल्या व्यक्तींच्या संपर्कात आल्याने कोरोनाची लागण होत असल्याचे आढळून आले. तसेच शिमगोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात मुंबई पुण्यातून नागरीक आपापल्या गावी दाखल झाले होते. त्याचाही फटका बसण्याची शक्यता आहे. सध्या आरोग्य यंत्रणेवर लसीकरण व प्रतिबंध अशा दोन्ही आघाड्यांवर काम करण्याची वेळ आली आहे. मनुष्यळ कमी पडत असल्याने तालुक्यातील नागरीकांनी आपली जबाबदारी समजून आरोग्य यंत्रणेस सहकार्य करावे."

- डॉ. प्रभाकर भावठाणकर, तालुका वैद्यकीय अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com