रसायनी येथे पर्यावरणविषयक जनसुनावणी

लक्ष्मण डुबे 
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड, भारत सरकारचा उपक्रम यांच्या रसायनी येथील प्रस्तावित पाँलीप्राँपिलियन युनिट उभारण्याच्या तसेच भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड मुंबई रिफायनरी ते रसायनी पाइपलाईन टाकण्याच्या प्रस्तावित प्रकल्पाबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मंगळवारी एचओसीएल काँलनीत रसरंग हाँलमध्ये पर्यावरण विषयक जाहीर जनसुनावनी बोलविली होती. या प्रकल्पासाठी एचओसीएल कंपनीकडून जमीन खरेदी केली आहे. 

रसायनी (रायगड) : भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड, भारत सरकारचा उपक्रम यांच्या रसायनी येथील प्रस्तावित पाँलीप्राँपिलियन युनिट उभारण्याच्या तसेच भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड मुंबई रिफायनरी ते रसायनी पाइपलाईन टाकण्याच्या प्रस्तावित प्रकल्पाबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मंगळवारी एचओसीएल काँलनीत रसरंग हाँलमध्ये पर्यावरण विषयक जाहीर जनसुनावनी बोलविली होती. या प्रकल्पासाठी एचओसीएल कंपनीकडून जमीन खरेदी केली आहे. 

जनसुनावनी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन पनवेल उपविभागीय अधिकारी दत्तात्रेय नवले, प्रदूषण नियंत्रक मंडळाचे प्रादेशिक अधिकारी जगन्नाथ सांळुखे, खालापुर नायब तहसीलदार आदि उपस्थित होते. प्रारंभी बीपीसीएल कंपनीचे वरिष्ठ अधिकारी नरेंद्र पाटील यांनी प्रस्ताविक करताना प्रकल्पा बाबतची सर्व प्रकारची माहिती दिली. त्यानंतर आचारसंहिता आसताना जनसुनावणी घेतली जात आहे. तसेच जिल्हाधीकारी उपस्थित नसल्यने स्थानिकांनी मत मांडताना नाराजी व्यक्त केली आहे आणि  प्रकल्पाला प्रदूषणच्या मुद्यावर विरोध केला आहे. रसायनी प्रकल्पग्रस्त विकास सामाजिक संस्थेचे  सचिव काशीनाथ कांबळे आठ गावाची जनसुनावणी आसताना परीसरातील ग्रामपंचातीना कळविले नाही, मग हरकत कशी घेणार, तसेच दिलेल्या पत्रात प्रदूषण नियंत्रण मंडळाने विषय वेगळा आणि मजकुर वेगळा असल्याची माहिती काशीनाथ कांबळे यांनी बोलताना समोर आणली. तर फसवणुक असल्याची तक्रार केली. तसेच पाईप लाईन जनसुनावणी स्वतंत्र घ्यायला पाहिजे होती, तसेच विकास असला पाहिजे, मात्र माणसाच्या जिवनाला घातक नाही पाहिजे असे सांगुन प्रकल्पाला विरोध असल्याचे सांगितले. 

दरम्यान, याशिवाय अध्यक्ष तात्यासाहेब म्हसकर, सहसचिव समीर खाने, उपाध्यक्ष रमेश पाटील तसेच डाँ पद्मनाथ पळणीटकर, सुरेश रानाडे, यादव दिघे, रामभाऊ पाटील, दत्ताराम दळवी, पांडुंरग माळी, विजय खारकर, उदय शिंदे, दत्तात्रेय जांभळे, गजानन माळी, आनंता दळवी आदिंनी प्रकल्पाच्या विरोधात मत मांडली आहे. तसेच या जनसुनावणी कार्यक्रमाला रायगड जिल्हा परिषद महिला आणि बालकल्या सभापति ऊमाताई मुंढे, जिल्हा परिषद सदस्य राजु पाटील, खालापुर तालुका पंचायत समिति सभापति कांचन पारंगे, सदस्य वृषाली पाटील, पनवेल तालुका पंचायत समिति जगदीश पवार  आदि मान्यावर तसेच परीसरातील गावांमधील एचओसी प्रकल्प ग्रस्त इतर नागरिक मोठ्या संख्याने उपस्थित होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Environmental public hearing in rasayani