कोकण रेल्वे मार्गावरील मडगाव-मुंबई फेस्टिवल स्पेशलला मुदतवाढ

राजेश कळंबटे
Sunday, 1 November 2020

त्यानुसार २ नव्या फेस्टीवल स्पेशल धावणार असून दोन्ही गाड्याआरक्षित असणार आहेत

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर २४ ऑक्टोबरपासून सुरु झालेल्या मडगाव-मुंबई फेस्टिवल स्पेशलला १५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. को रे मार्गावर दीपावलीसाठी २ नव्या फेस्टीवल स्पेशल १ नोव्हेंबरपासून नियमितपणे धावणार आहेत. ३१ ऑक्टोबर पासून दोन्ही।गाड्यांचे आरक्षणही खुले झाले आहे दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर मडगाव- मुंबई (सीएसएमटी) फेस्टीवल स्पेशलच्या १६ फेऱ्या चालवण्यात आल्या. दीपावलीच्या पार्श्वभूमीवर या गाडीला मुदतवाढ देत ती नियमितपणे चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यानुसार २ नव्या फेस्टीवल स्पेशल धावणार असून दोन्ही गाड्याआरक्षित असणार आहेत.०१११२।क्रमांकाची मडगाव-मुंबई (सीएसएमटी) फेस्टीवल स्पेशल १ नोव्हेंबरपासून १४ जानेवारीपर्यंत नियमित धावणार आहे. मडगाव येथुन सायं. ६ वा. सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ५.५० वा. मुंबई।(सीएसएमटी)ला पोहचेल. परतीच्या प्रवासात प्रवासात ०११११ क्रमांकाची गाडी २ नोव्हेंबरपासून रात्री११.०५वा. मुंबई (सीएसएमटी) येथून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी १०.४५ वा. मडगावला पोहोचेल

.०१११४ क्रमांकाची मडगाव-मुंबई।(सीएसएमटी) ही नवी गाडी सकाळी ९.१५ वा. मडगाव येथून सुटून रात्री ९.४०वा. मुंबई (सीएसएमटी) ला पोहचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी मुंबई (सीएसएमटी येथून सकाळी७.१० वा. सुटून सायं. ७ वा. मडगावला पोहोचेल.

हेही वाचा- महाराष्ट्रात बसून काळ्यादिनाबाबत वक्तव्य करणाऱ्यांनी बेळगावात येऊन बोलावे -

२२ डब्यांच्या या गाडीला करमाळी, थिविम, पेडणे, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड,राजापूर रोड, विलवडे, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पनवेल, ठाणे, दादर आदी ठिकाणी थांबे देण्यात आले आहेत.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Extension of Madgaon Mumbai Festival Special on Konkan Railway starting from 24th October till 15th January