
यंदा कोरोनामुळे गावी आलेल्या चाकरमान्यांमध्ये मर्यादा होत्या. दरवर्षी उत्सवाला येण्याआधी परतीच्या गाड्यांचे आरक्षण होत असे. त्यामुळे चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासाची मोठी धांदल पाहायला मिळत असे. यंदा मात्र कोरोनाने व्यत्यय आणला.
चाकरमान्यांचा परतीचा मार्ग सुकर, देवगड अगाराचे अनोखे योगदान
देवगड (सिंधुदुर्ग) येथील आगारातून चाकरमान्यांच्या सोयीसाठी मुंबई मार्गावर आजपर्यंत एसटीच्या 56 बस तर पुणे मार्गावर एक बस, अशा एकूण 57 बस सोडण्यात आल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक बसमध्ये 22 प्रवासी याप्रमाणे सुविधा पुरविल्याची माहिती वाहतूक नियंत्रक टी. एस. देवरूखकर यांनी दिली.
यंदा कोरोनामुळे गावी आलेल्या चाकरमान्यांमध्ये मर्यादा होत्या. दरवर्षी उत्सवाला येण्याआधी परतीच्या गाड्यांचे आरक्षण होत असे. त्यामुळे चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासाची मोठी धांदल पाहायला मिळत असे. यंदा मात्र कोरोनाने व्यत्यय आणला. गौरी गणपती विसर्जनानंतर चाकरमान्यांनी परतीचा मार्ग धरला. येथील आगारातून आजपर्यंत एकूण 57 बस मुंबई मार्गावर सोडण्यात आल्या. यामध्ये 38 जादा गाड्या तर 18 समूह आरक्षित बसचा समावेश आहे. तसेच एक बस पुणे मार्गावर सोडण्यात आली.
24 ऑगस्टला देवगड -बोरीवली, शिरगाव -बोरीवली, 25 ऑगस्टला देवगड -बोरीवली, देवगड -कुर्लानेहरूनगर, 28 ऑगस्टला देवगड -मुंबई, देवगड -बोरीवली, 29 ऑगस्टला देवगड-मुंबई, शिरगाव -बोरीवली, अशी प्रत्येकी एक गाडी त्याचदिवशी देवगड -बोरीवली, देवगड -कुर्लानेहरूनगर मार्गावर प्रत्येकी दोन गाड्या, 30 ऑगस्टला देवगड -मुंबई आणि कुर्लानेहरूनगर प्रत्येकी एक गाडी तसेच बोरीवली मार्गावर 6 गाड्या, 3 सप्टेंबरला देवगड -बोरीवली मार्गावर 4 गाड्या, 5 रोजी देवगड-बोरीवली 8 गाड्या, 9 रोजी देवगड -बोरीवली मार्गावर सहा बस, अशा एकूण 38 बस मुंबई मार्गावर धावल्या.
30 ऑगस्टला पुणे मार्गावर एक बस सोडण्यात आली. तसेच समुह आरक्षणानुसार 29 ऑगस्टला शिरगाव -बोरीवली, मोंड -बोरीवली, मोंड -भांडूप, सायन, 30 रोजी नाद -शिवडी मुंबई, मणचे-घाटकोपर, 3 सप्टेंबरला मोंड -बोरीवली, वागदेवाडी -विरार, टेंबवली -मुंबई, 4 रोजी जामसंडे -बोरीवली, पाटथर -विरार, 5 रोजी मोंड -विरार, 6 रोजी मोंड -विरार, वरंडवाडी -विरार, मोंडतर -बोरीवली, मोंड -बोरीवली, 10 रोजी देवगड -डोंबिवली -कुर्लानेहरूनगर, अशा प्रत्येकी एक गाड्या मार्गस्थ झाल्या. एकूण 18 गाड्या समूह आरक्षित होत्या.
बहुतांश चाकरमानी परतले
गणेशोत्सवानंतर काहीजण महालय करून मुंबईला माघारी परततात. त्यानुसार गणपती उत्सवानंतरही आजपर्यंत जादा गाड्या मुंबई मार्गावर धावत आहेत. आता बहुतांश चाकरमानी परतले आहेत.
दृष्टिक्षेपात
- आजपर्यंत एकूण 57 बस मुंबई मार्गावर
- 38 जादा तर 18 समूह आरक्षित बसचा समावेश
- एक बस धावली पुणे मार्गावर
- कोरोनामुळे यंदा सुविधांमध्ये व्यत्यय
संपादन - राहुल पाटील
Web Title: Extra Buses Workers Devgad Konkan Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..