esakal | प्रवाशांना दिलासा; कोकण रेल्वे मार्गावरील दोन गाड्यांना अतिरिक्त डबा 
sakal

बोलून बातमी शोधा

Extra coaches for two trains on the Konkan railway line

दिवाळीमध्ये कोकणात फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना या गाड्यांचा फायदा होणार आहे.

प्रवाशांना दिलासा; कोकण रेल्वे मार्गावरील दोन गाड्यांना अतिरिक्त डबा 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : दीपावलीच्या पार्श्वभूमीवर पश्‍चिम रेल्वेने कोकण मार्गावर धावणाऱ्या जामनगर - तिरुनवेली व गांधीधाम - तिरुनवेली या दोन साप्ताहिक विशेष रेल्वेगाड्यांना एक अतिरिक्त डबा जोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 13 नोव्हेंबरपासून या दोन्ही गाड्या जादा डब्यांच्या धावत आहेत. वाढीव डब्यांमुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. 


जामनगर - तिरुनवेली साप्ताहिक विशेष गाडी 13 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत 23 डब्यांऐवजी 24 डब्यांची धावणार आहे. या गाडीला एक स्लिपर कोच जोडण्यात येणार आहे. परतीच्या प्रवासात ही साप्ताहिक गाडी 16 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या कालावधीत धावणार आहे. गांधीधाम-तिरुनवेली साप्ताहिक विशेष गाडी 16 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत 22 डब्यांऐवजी 23 डब्यांची धावणार आहे. परतीच्या प्रवासात ही गाडी 19 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर या कालावधीत धावणार आहे. या गाडीलाही 1 स्लिपर कोच डबा वाढवण्यात आला आहे.

हेही वाचा- Photo: मुरूड, कर्दे, लाडघरसह गणपतीपुळे पर्यटकांनी गजबजला

दिवाळीमध्ये कोकणात फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना या गाड्यांचा फायदा होणार आहे. सध्या दिवाळीची सुट्टी असून नियमित रेल्वेगाड्या कोरोनामुळे सुरू झालेल्या नाहीत. लोकांची गर्दीही दिवसेंदिवस वाढत असल्याने सध्या धावणाऱ्या गाड्यांची क्षमता वाढविण्यावर रेल्वे प्रशासनाचा भर आहे. आरक्षण मिळत नसल्याने अनेक प्रवाशांना प्रवास टाळावा लागत आहे. कोकण रेल्वेकडून प्रवाशांची कसून तपासणी होत असल्याने गाडीच्या नियमित वेळेपूर्वी एक तास आधी जावे लागते. गाड्या कमी आणि आरक्षणासाठीची वेटिंग लिस्ट अधिक अशी परिस्थिती आहे. त्यामुळे खासगी वाहतुकीकडे लोकांचा कल वाढत आहे. 

संपादन- अर्चना बनगे

loading image
go to top