esakal | सावधान, फसविले जाल! डीवायएसपींच्या नावाने फेक अकाउंटद्वारे पैशाची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

Fake Facebook account on name of Ratnagiri Sub Divisional Police Officer Ganesh Ingle

डीवायएसपी गणेश इंगळे यांच्या नावाने कोणीतरी नोयाडामधून फेसबुक अकाउंट काढले आहे.

सावधान, फसविले जाल! डीवायएसपींच्या नावाने फेक अकाउंटद्वारे पैशाची मागणी

sakal_logo
By
राजेश शेळके

रत्नागिरी - सायबर गुन्हेगारांकडून होणार्‍या ऑनलाइन फसवणुकीबाबत खबरदारी बाळगण्याचे आवाहन करणार्‍या पोलिस अधिकार्‍यांच्या नावाचा वापर सायबर गुन्हेगारांनी केल्याचा प्रकार पुढे आला आहे. राजस्थानच्या एका भामट्याने चक्क रत्नागिरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट तयार केले करून त्यावरून पैशाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.

ग्रामीण पोलिस ठाण्यात संशयित भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

राजस्थानी भामट्याचा हा प्रकार आज दुपारी उघडकीस आला. या संशयित भामट्याने रत्नागिरीतील अनेकांना फेसबुकवर मेसेज पाठवत पैशाची मागणी केली. या फेसबुक अकाउंटला डीवायएसपी गणेश इंगळे यांचा फोटो आहे. त्यामुळे अनेकांचा यावर विश्वास बसत आहे. मात्र हे बनावट अकाउंट असल्याचा खुलासा डीवायएसपी गणेश इंगळे यांनी केला आहे. हा भामटा ज्या मोबाईलवर संपर्क करायला सांगत आहे व ज्या बँक अकाउंटवर पैसे भरायला सांगत आहे, त्याची माहिती त्वरित पोलिसांना द्यावी व तपासकार्यात मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यात कार्यरत असलेले डीवायएसपी गणेश इंगळे यांच्या नावाने कोणीतरी नोयाडामधून फेसबुक अकाउंट काढले आहे. तो राजस्थानमधून चालवत असल्याची माहिती मिळत आहे. याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. डीवायएसपी इंगळे यांच्या फेसबुक अकाऊंटवरून त्यांच्या मित्रपरिवारातील लोकांना मेसेज पाठवला गेला. 50 ते 60 लोकांकडून प्रत्येकी 30 ते 40 हजार रुपयाची मागणी केली. त्यामध्ये त्यांच्या गावातील लोक, खात्यातील, मित्रपरिवार आणि रत्नागिरीतील लोकांनाही हा मेसेज गेला आहे. आज दुपारी सिंधुदुर्गमधील त्यांच्या मित्रांनी ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच ज्या फेसबुक अकाउंटवर स्टेट्स ठेवला आणि लोकांच्या मनात आणखीन शंका आली. यावरून सगळा प्रकार लक्षात आल्यावर पोलिस यंत्रणा तत्काळ कामाला लागली आहे.

हे पण वाचा - बाप रे ; चिकन ६५ खाल्ले अन् पैसे मागितले म्हणून फुकट्यांचा तलवारीने हल्ला

माझा फोटो व नाव वापरून कोणीतरी फेक फेसबुक अकाऊंट तयार केलेले आहे. त्याद्वारे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून पैशाची मागणी केली जात आहे. कृपया अशी रिक्वेस्ट पुन्हा स्वीकारू नये किंवा फ्रेंड झाला असाल तर कृपया संबंधित फ्रॉड व्यक्तीला पैसे किंवा इतर मदत करू नये. त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे.

- गणेश इंगळे, उपविभागीय पोलिस अधिकारी, रत्नागिरी  

हे पण वाचापालकांनो सावधान ! तुमची मुलं नाहीत ना, फाळकूटदादांच्या संर्पकात ? 

 
संपादन - धनाजी सुर्वे 

loading image