वीज पडुन शेतकऱ्यांचा मृत्यु ; लोरे दुधमवाडी येथील प्रकार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जून 2020

लवु मांडवकर हे शेतकरी शेतात भातलावणीच्या कामात व्यस्त होते.

वैभववाडी - वीज पडुन लोरे दुधमवाडी येथील लवु वसंत मांडवकर वय - ४५ या शेतकऱ्यांचा शेतातच मृत्यु झाला.हा प्रकार आज ता.२७ सांयकांळी सहा वाजण्याच्या सुमारास झाला.

आज सांयकाळी तालुक्यात विजांच्या कडकडाटांसह पाऊस झाला.लोरे परिसरात देखील पाऊस झाला.दरम्यान लोरे येथील लवु मांडवकर हे शेतकरी शेतात भातलावणीच्या कामात व्यस्त होते.सहा वाजण्याच्या सुमारास विजांचा मोठा आवाज या परिसरात झाला.विजेचा लोळ श्री.मांडवकर यांच्या अंगावर पडला.यामध्ये श्री.मांडवकर यांचा जागीच मृत्यु झाला.अचानक झालेल्या विजेच्या आवाजाने शेतात काम करीत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये भिती निर्माण झाली आहे.
श्री.मांडवकर हे मुंबईहुन आलेले होते.विलगीकरण कक्षातील कालावधी संपल्यानतंर ते गेल्या दोन दिवसांपासुन भातलावणीचे काम करीत होते.त्यांच्या पश्‍यात पत्नी,दोन मुले असा परिवार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers die due to lightning strike in ludhanwadi

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: