
- भगवान खैरनार
मोखाडा : पालघर जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकरी हा आदिवासी असला तरी शेतीमध्ये आधुनिक तंत्राचा वापर करून परिस्थितीनुसार शेती पद्धतीत बदल करून शेती करत आहे.जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल यांच्या मार्गदर्शनाने आणि प्रचार प्रसिद्धीमार्फत जिल्ह्यात भात यांत्रिकीकरण, राबविरहित भात लागवड,टोकन पद्धत, सगुणा तंत्रज्ञान, आधुनिक भात ट्रे रोपवाटिका, मॅट रोपवाटिका अशा भात शेतीच्या आधुनिक तंत्राचा जिल्ह्यातील शेतकरी आपल्या शेतीत अवलंब करीत असल्याने शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीकडे वाटचाल करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे गतवर्षी जिल्ह्यात 24 हेक्टरने भात लावणीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.