सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अपूर्ण धरण प्रकल्प मार्गी लागणार असून सुधारित प्रस्ताव तयार करण्याचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिले
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी अडचणीतsakal
Updated on

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अपूर्ण धरण प्रकल्प मार्गी लागणार असून सुधारित प्रस्ताव तयार करण्याचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिले आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक यांनी दिली. कळसुली जिल्हा परिषद मतदारसंघातील देदोनेवाडी प्रकल्पांचाही प्रश्न मार्गी लागणार आहे, असेही त्यांनी सांगितले.गेली अनेक वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुधारीत प्रशासकीय मान्यतेअभावी प्रलंबित असलेले धरण प्रकल्प अपूर्ण अवस्थेत आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत आले आहेत.

गेल्या काही वर्षांत म्हणावे तसे गांभीर्याने या अपूर्ण धरण प्रकल्पाकडे कोणी पाहिले नाही, म्हणून युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुद्रीक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून धरण प्रकल्पांच्या सुधारीत प्रशासकीय मान्यतेचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनुक्रमे देवधर, तरंदळे, देदोनेवाडी, नाधवडे, ओटाव, कोर्लेसातेडी, तळेरे हे धरण प्रकल्प मार्गी लागणे आवश्यक आहेत. आतापर्यंत जलसंपदा विभागाकडून उपरोक्त सात प्रकल्पांची कामे अंशतः पूर्ण झाली असून लाभ क्षेत्राची कामे ५ ते १० वर्षापासून सुप्रमामुळे प्रलंबित असल्याने सद्यस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या धरणातून उपलब्ध होत असलेल्या पाणीसाठ्याचा योग्य प्रकारे उपयोग करणे शक्य होत नाही.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत
रत्नागिरीतील 10 तरूणांनी केला ढाक भैरी आणी कळकराय सुळका सर

या धरणांचे लाभक्षेत्र विकासासह सर्व कामे पूर्ण झाल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड, कणकवली, वैभववाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना धरणातील पाणीसाठ्याचा तसेच धरणाखालील शेतजमीनीत समाविष्ट होणाऱ्या लाभ क्षेत्राचा विकास होणार आहे. हे प्रकल्प मार्गी लागल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १५७५१ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याची सविस्तर माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल सुद्रिक यांनी मंत्रालयात ९ डिसेंबरला उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेऊन दिली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष निरीक्षक आमदार शेखर निकम, अर्थ मंत्रालयाचे सेक्रेटरी, कार्यकारी अभियंता कदम उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत
देवरुखची निदा खालीद शेख फिल्म फेअर अवॉर्डने सन्मानित

यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धरण प्रकल्पांचे प्रलंबित असलेले प्रस्ताव लवकरच सुधारीत प्रशासकीय प्रस्ताव तयार करून मान्यतेसाठी ठेवण्याचे आदेश अर्थ विभागाचे सचिव तसेच जलसंपदा विभाग यांना दिले. उपमुख्यमंत्री पवार यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गेली ५ ते १० वर्षे प्रलंबित असलेल्या धरणाच्या कामांना गती मिळेल आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल, असे सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक यांनी सांगितले.देदोनेवाडीसह तरंदळे, देवधर, नाधवडे ओटव, कोर्लेसोतडी, तळेरे धरणांच्या प्रलंबित असलेल्या कामांचे सुधारीत प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी तात्काळ सादर करण्याचे जलसंपदा विभागाला आदेश दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com