जिल्ह्यातील दीड लाख काजू उत्पादकांची (Cashew Nut Growers) जिल्ह्यात ७९ हजार हेक्टरवर काजू लागवड आहे.
वैभववाडी : लांबलेला पाऊस, सध्या निर्माण झालेले ढगाळ वातावरण (Cloudy Weather) आणि पुढील दोन दिवसांतील पावसाचा अंदाज यामुळे यावर्षीच्या काजू हंगामाला (Cashew Season) बदलत्या वातावरणाचा ग्रहण लागणार हे निश्चित झाले आहे. त्यामुळे बदललेल्या निसर्गचक्रात काजूला वाचवायचा कसा? हा प्रश्न आता काजू उत्पादकांसमोर निर्माण झाला आहे.