esakal | बापाने फासला नात्याला काळीमा , मुलीला केले कुमारी माता
sakal

बोलून बातमी शोधा

father physically abusing daughter case in sangameshwar ratnagiri mumbai police arrest her father

बापाच्या नात्याला काळीमा फासत मुलीवर केले शारिरीक अत्याचार
आरोपीला संगमेश्वर तालुक्यातुन अटक

बापाने फासला नात्याला काळीमा , मुलीला केले कुमारी माता

sakal_logo
By
प्रमोद हर्डीकर

साडवली (रत्नागिरी) : बाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासत आपल्या जन्मदात्या मुलीजवळ प्रथम लगट करुन कालांतराने तिच्यावर शारीरिक अत्याचार  करणाऱ्या नराधम बापाला काल पंतनगर , मुंबई पोलीसांनी संगमेश्वर तालुक्यातील कडवई या मूळ गावातून अटक केली आहे . विष्णू तुकाराम ओकटे ( ४८ )  असे आरोपीचे नांव आहे . या घृणास्पद प्रकाराने अत्यंत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत . 


घाटकोपर कामराजनगर मधे राहणाऱ्या विष्णूने एके दिवशी घरातील हॉलमध्ये झोपलेल्या अल्पवयीन मुलीजवळ येवून जबरदस्तीने तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. यानंतर हि मुलगी तणावाखाली वावरत होती.  लॉकडाऊनच्या काळात यातून सुटका मिळवण्यासाठी मुलगी संगमेश्वर तालुक्यातील कडवई या आपल्या मूळ गावी आली .

हेही वाचा- नाणार रिफायनरीला पूर्ण विराम ? वाचा सविस्तर -

मात्र काही तरी निमित्त काढून विष्णु गावी आला आणि त्यांनी गावी देखील मुलीवर शारीरिक अत्याचार केले. यातून मुलगी गर्भवती झाली. तिने हि सगळी हकीकत आपल्या बहिणीला संगीतली. यानंतर काही कालावधीतच मुलीने एका मुलाला जन्म दिला. मुलगी अल्पवयीन असल्याने हा सारा प्रकार कुमारी माता म्हणून पुढे आला . याबाबत मुलीच्या जबाबावरुन पंतनगर पोलीस ठाणे मुंबई येथे विष्णू तुकाराम ओकटे ( ४८ ) याच्या विरूध्द गुन्हा रजि . नंबर ५३६ / २०२० भादवि कलम ३७६ , ३७६ ( २) ५०६ , ४ , ६ , ८ , १० , १२ नुसार गुन्हा दाखल केला . 

हेही वाचा- सिंधुदुर्गवासीयांना गुड न्यूज! शासनाच्या योजना आता एकाच छताखाली -


 काल पंतनगर पोलीसांनी संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथे येवून आरोपी विष्णू तुकाराम ओकटे याला अटक करुन पुढील तपासासाठी मुंबईला नेले आहे. या दुर्दैवी आणि लज्जास्पद घटनेमुळे  परिसरात अत्यंत संताप आणि चिड व्यक्त करण्यात येत आहे . बापाच्या नात्याला काळीमा लावणाऱ्या या नराधमा विरूध्द कठोर आणि कडक कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

संपादन - अर्चना बनगे

loading image