Sindhudurg: दोन दिवसांपूर्वी अभिनेत्रीच्या हस्ते उद्घाटन झालेल्या मॉलला टाळं, एफडीएनं केली कारवाई

FDA Shuts Down Aapla Bazar Mall in Kudal: कुडाळमधील ‘आपला बझार’ मॉलवर एफडीएची कारवाई; वैध FSSAI परवाना नसल्याने व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले.
Sindhudurg

Sindhudurg

esakal

Updated on

कुडाळ: शहरात सिनेअभिनेत्रीला आणून मोठ्या थाटात सुरू झालेल्या ‘आपला बझार’ मॉलवर अन्न व औषध प्रशासन विभागाने शुक्रवारी (ता. १९) सायंकाळी ‘व्यवसाय बंद’ची कारवाई केली. जोपर्यंत आवश्यक परवाना घेतला जात नाही, तोपर्यंत ‘आपला बझार’ बंद राहणार आहे. मॉल विनापरवाना सुरू असल्यामुळे आम्ही ही तपासणी केली. तेथे संशय आल्याने गुळाचे नमुनेसुद्धा घेण्यात आले आहेत. ग्राहकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा इशारा पत्रकार परिषदेत अन्न सुरक्षा अधिकारी अभय चंदनशिवे यांनी दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com