रत्नागिरीमध्ये शहर पोलिस ठाण्यात कोरोनाचा शिरकाव...

राजेश शेळके
Wednesday, 22 July 2020

काल रात्री रत्नागिरी तालुक्यातील 12 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे अहवाल प्राप्त झाले.

रत्नागिरी : रत्नागिरी शहर आणि परिसरात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असताना आता शहर पोलिस ठाण्यात कोरोनाने शिरकाव केला आहे. शहर पोलिस ठाण्यातील एका महिला पोलिस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे.

 काल रात्री रत्नागिरी तालुक्यातील 12 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे अहवाल प्राप्त झाले. या अहवालात शहर पोलिस ठाण्यातील एका महिला पोलिस कर्मचाऱ्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. पोलिस दलात काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाकडून घेण्यात आला होता. यानुसार शहर पोलिस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांनी स्वॅब दिला. यात एका महिला कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या कर्मचाऱ्याला कोरोनाची कोणतीच लक्षणे नसताना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

हेही वाचा- कोकणातील ग्रामपंचायतीचे चाकरमान्यांसाठी  नियम : मुंबईकर चाकरमान्यांपर्यंत धाडले निरोप... -

 दरम्यान मंगळवारी रात्री आलेल्या अहवालानुसार रत्नागिरी शहर आणि परिसरात 12 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यात वाटद खंडाळा परिसरातील 2, झारणी रोड येथील 1, जुना माळनाका येथील डॉक्टर, फिनॉलेक्स कॉलनीतील 1, आरोग्य मंदिर येथील 2, नाटे येथील 1, सिविल कर्मचारी 1 आणि खासगी रुग्णालय येथील 1 डॉक्टर आणि 1 नर्स कोरोना बाधित सापडली आहे.    

संपादन - अर्चना बनगे                                          ............


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: female police officer at the city police station was infected coronavirus