कोकणात विशेष रेल्वे का आली रिकामी ?

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 16 August 2020

अवघे 11 चाकरमानी या ट्रेनने रत्नागिरी रेल्वे स्थानकात उतरले

रत्नागिरी : उलटलेला दहा दिवसाचा क्वारंटाईन कालावधी आणि कोकणात येण्यापूर्वी 48 तास आधी कोरोना तपासणीचा निगेटिव्ह अहवाल यामुळे कोकणात गणेशोत्सवानिमित्त चाकरमान्यांसाठी सोडण्यात आलेल्या विशेष ट्रेनला अत्यल्प प्रतिसाद मिळाला.

हेही वाचा - चिपळूणात अख्खी रात्र त्यांनी काढली जागून ; काय कारण ?

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष ट्रेन सोडण्यात येत आहेत. जवळपास 187 फेऱ्या ट्रेनच्या सोडण्यात येणार आहेत. शनिवारी रात्री लोकमान्य टिळक टर्मिनस ते रत्नागिरीसाठी सुटलेली पहिली गणपती स्पेशल ट्रेन आज पहाटे रत्नागिरी रेल्वे स्थानकात दाखल झाली. वेळेआधीच जवळपास अर्धा ते पाऊण तास अगोदर ही ट्रेन रत्नागिरी रेल्वे स्थानकात दाखल झाली. मात्र अवघे 11 चाकरमानी या ट्रेनने रत्नागिरी रेल्वे स्थानकात उतरले. त्यामुळे अतिशय अल्प प्रतिसाद या ट्रेनला मिळाल्याचं पहायला मिळालं.  

दुसऱ्या ट्रेननेही अवघे 16 प्रवासी रत्नागिरी रेल्वे स्थानकात उतरले. रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर आलेली दुसरी ट्रेन म्हणजेच सीएसएमटी - सावंतवाडी ही ट्रेन सावंतवाडीकडे रवाना झाली. मात्र सावंतवाडीकडे रवाना होताना सुद्दा रेल्वेचे अनेक डब्बे रिकामे पहायला मिळाले. 

हेही वाचा -  Good News : कोकणातल्या या शहराला मिळणार पंतप्रधानांच्या हस्ते बक्षीस..

दरम्यान, विलगीकीकरणात राहण्यासाठीचा दहा दिवसांचा कालावधी निश्चित केला आहे. जे चाकरमानी 12 ला आले त्यांना गणपतीच्या पहिल्या दिवसाच्या उत्सवात सहभागी होता येणार आहे. त्यांनतर आलेल्या लोकांना विलगीकीकरण कालावधी संपेपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. त्यामुळे चाकरमानी कोकणकडे येण्यास अनुत्सुक होते. याच कालावधीत कोकण रेल्वे मार्गांवर गाड्या सोडण्यात आल्याने त्याला अल्प प्रतिसाद मिळत आहे.

संपादन - स्नेहल कदम


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: few people responded to special central trains run on konkan rail line