पाचवीतील विद्यार्थ्याची दाभोळमध्ये आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 आत्महत्या

पाचवीतील विद्यार्थ्याची दाभोळमध्ये आत्महत्या

दाभोळ - दाभोळ येथील पाचवीतील विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा गंभीर प्रकार शुक्रवारी (ता. २२) घडला. या विद्यार्थ्याने आत्महत्या का केली याचा शोध पोलिस घेत आहेत. रुद्र विनायक पदुकले (वय १२) असे त्या विद्यार्थ्याचे नाव आहे. दाभोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दाभोळ गावातील टेमकरवाडी (वरचा विभाग) येथे राहणारा रुद्र पदुकले हा दापोली येथील एका शाळेत पाचवीत शिकत होता. शुक्रवारी (ता. २२) घरी रुद्र, आजी व आजोबा असे तिघेच होते. त्याने आजोबांकडून ५० रुपये घेतले व दुकानातून मॅगीचे पाकीट आणले. मॅगी तयार केली व घराच्या माडीवर तो टीव्ही पाहत खात बसला होता. आजी-आजोबा व लहान बहीण खाली घरातच होते. आई-वडील त्यांच्या भाजीच्या दुकानात गेले होते. सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास वादळाला सुरुवात झाल्याने वीज गेली. वीज गेली तरी रुद्र खाली का आला नाही हे पाहण्यासाठी आजी माडीवर गेली असता, तिला रुद्र नायलॉन दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. आजीने आजोबांना बोलावले व दोघांनी त्याला खाली काढले व दाभोळ येथील एका डॉक्टरांकडे नेले. त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही तेथे बोलावण्यात आले. त्यांनी रुद्रला तपासून तो मृत झाल्याचे जाहीर केले. रुद्रने एवढ्या लहान वयात आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप कळू शकले नाही. दाभोळ सागरी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पूजा हिरेमठ करत आहेत.

Web Title: Fifth Class Student Suicide In Dabhol

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top