
पावस ( रत्नागिरी ) - पावस जिल्हा परिषद गटांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकांच्या मोर्चेबांधणीला सुरवात झाली असून उमेदवार निवडीची रस्सीखेच सुरू असून शिवसेना-भाजप पॅनल या वेळी मागील पंचवार्षिक निवडणुकीप्रमाणे पुन्हा एकदा समोरासमोर ठाकणार आहेत. सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीनंतर पडणार असल्याने अनेकांच्या वर्चस्वाला धोका निर्माण झाला आहे.
पावस जिल्हा परिषद गटामध्ये पावस, नाखरे, शिवार आंबेरे, गावखडी व डोर्ले, दाभिळ आंबेरे या 5 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या असून प्रत्येक प्रभागाचे आरक्षणही यापूर्वी जाहीर झाले आहे; मात्र सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशी होणार असल्याने राजकीय वर्तुळात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. कारण प्रत्येकवेळी आरक्षण पडल्यानंतर प्रत्येकाला आपले वर्चस्व राखण्याकरिता त्याला पक्षाचे काही देणेघेणे नसतं.
अशा अवस्थेत आपण किंवा नातेवाईकाला पदावर बसविण्यासाठी अनेक तडजोडी केल्या जातात. परंतु या खेपेस सरपंचपदाचे आरक्षण न पडल्यामुळे राजकीय पुढाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे कोणतेही आरक्षण पडले तरी आपले वर्चस्व निर्माण करता यावे, यासाठी आपल्या गटाचे सदस्य उभे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शिवसेना व भाजप स्वबळावर निवडणूक लढविण्याच्यादृष्टीने बैठकांचा सिलसिला सुरू आहे.
नाखरे, पावस, शिवार आंबेरे या ग्रामपंचायतींचे सरपंच आमदार गटाचे होते, तर डोर्ले येथे भाजपाचे, गावखडी येथे वीस वर्षाची सत्ता संपुष्टात आणून गाव पॅनेलने वर्चस्व निर्माण केले होते. पुन्हा सेनेचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी जुन्या-नव्यांचा मेळ घालून सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्या दृष्टीने हालचालींना वेग आला आहे. या गटामध्ये शिवसेना व राष्ट्रवादीमधून सेनेत आलेले कार्यकर्ते एकत्र आल्यामुळे जुन्या-नव्याचा वाद मिटल्यास सेनेचे निर्विवाद वर्चस्व राहणार आहे; मात्र भाजपाला निकराची झुंज द्यावी लागणार आहे.
या परिसरात भाजपचे माजी आमदार बाळ माने यांच्या गटाचे वर्चस्व असून नवीन जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन यांच्या गटाने विश्वासात न घेतल्यामुळे सध्यातरी दोन गट कार्यरत आहेत. हे दोन्ही गट पक्ष म्हणून काय करतात, यावर सर्व गणिते अवलंबून आहेत. कारण ग्रामपंचायतीवर वर्चस्व निर्माण झाल्यास नवीन जिल्हाध्यक्षांचे गुणगान होण्याची शक्यता निर्माण झाल्याने तडजोडीची भूमिका काय होते, यावरच भाजपचे वर्चस्व अवलंबून आहे. सध्या डोर्ले व गावखडी ग्रामपंचायतीवर बाळ माने गटाचे वर्चस्व आहे.
चार ग्रामपंचायतींवर होते महिलाराज
सध्या मागील पाच वर्षे नाखरेवगळता पावस, शिवार आंबेरे, गावखडी व डोर्ले ग्रामपंचायतीवर महिलाराज होते. त्यामुळे या खेपेस कोणते आरक्षण पडणार यावर सर्व इच्छुक लक्ष ठेवून आहेत. त्या दृष्टीने अनेकजण स्वतः अथवा पत्नीला रिंगणात उतरून आपले उद्दिष्ट सफल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.