esakal | देवगडात फिल्म फेस्टिवलला प्रारंभ 
sakal

बोलून बातमी शोधा

Film Festival Starts In Devgad Sindhudurg Marathi News

यामध्ये अनुक्रमे, तन्वीज्‌ ग्रुप, जामसंडे आदर्श केंद्रशाळा, श्री. मो. गोगटे माध्यमिक विद्यामंदिर, जामसंडे यांना पहिले तीन क्रमांक मिळाले तर उमा पवार शाळा आणि वॅक्‍स्‌ म्युझियम यांना उत्तेजनार्थ देण्यात आला.

देवगडात फिल्म फेस्टिवलला प्रारंभ 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

देवगड ( सिंधुदुर्ग ) - विविध कलाकारांच्या उपस्थितीत येथील कंटेनर थिएटरमध्ये आयोजित केलेल्या "सिंधुदुर्ग नॅशनल फिल्म फेस्टिवल'ला (एसएनएफएफ) प्रारंभ झाला. या निमित्त आयोजित शोभायात्रेत कलाकारांनी ठेका धरला. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत महोत्सवाचे उद्‌घाटन झाले. 

ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, अभिनेता शरद केळकर, अभिजित खांडकेकर, स्नेहल शिदम, अनिल गवस, शीतल शुल्क, रमा नाडगौडा, महोत्सव दिग्दर्शक सुमित पाटील उपस्थित होते. उद्‌घाटनापुर्वी शहरातून शोभायात्रा काढली होती. यामध्ये महिलांसह शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते. शोभायात्रेतील देखावा स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.

यामध्ये अनुक्रमे, तन्वीज्‌ ग्रुप, जामसंडे आदर्श केंद्रशाळा, श्री. मो. गोगटे माध्यमिक विद्यामंदिर, जामसंडे यांना पहिले तीन क्रमांक मिळाले तर उमा पवार शाळा आणि वॅक्‍स्‌ म्युझियम यांना उत्तेजनार्थ देण्यात आला. सुत्रसंचालन रमा नाडगौडा यांनी केले. दरम्यान, रविवारपर्यंत (ता. 8) महोत्सव चालणार असून विविध चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. नाट्य-सिने क्षेत्रातील आघाडीचे कलाकार उपस्थित राहतील. 

loading image