गुड न्यूज! अखेर कोकण रेल्वे धावणार, गणेशोत्सवासाठी विशेष गाड्या

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 15 August 2020

यातील 138 फेऱ्यांचा फायदा सिंधुदुर्गातील प्रवाशांना होणार आहे. याबाबतची माहिती कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी एल. के. वर्मा यांनी दिली आहे. 

कणकवली (सिंधुदुर्ग) - राज्य शासनाने हिरवा कंदील दाखविल्यानंतर कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सव विशेष गाड्या धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यात 15 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या दरम्यान मुंबई ते सावंतवाडी, कुडाळ आणि रत्नागिरी स्थानकादरम्यान मध्य रेल्वेच्या 162 विशेष गाड्या धावणार आहेत. यातील 138 फेऱ्यांचा फायदा सिंधुदुर्गातील प्रवाशांना होणार आहे. याबाबतची माहिती कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी एल. के. वर्मा यांनी दिली आहे. 

वाचा - सिंधुदुर्गातील  या  कर्तव्यदक्ष  पोलिस निरीक्षकास राष्ट्रपती पदक 

गाडी क्रमांक 01105 मुंबई सीएसटी ते सावंतवाडी ही विशेष गाडी 15 ते 22 ऑगस्ट दरम्यान धावणार आहे. सीएसटी स्थानकातून रात्री 10 वाजता सुटलेली ही गाडी सावंतवाडी स्थानकात दुसऱ्या दिवशी सकाळी 8.10 वाजता पोचणार आहे. परतीची 01106 ही गाडी 16 ते 23 ऑगस्ट दरम्यान धावणार आहे. सावंतवाडी स्थानकातून सकाळी 8.50 वाजता सुटलेली गाडी सीएसटी स्थानकात रात्री 8.05 वाजता पोचणार आहे. या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्‍वर, रत्नागिरी, विलवडे, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ येथे थांबा आहे. 

गाडी क्रमांक 01101 सीएसटी ते सावंतवाडी 15 ते 22 ऑगस्ट दरम्यान धावणार आहे. सीएसटी स्थानकातून रात्री 11.05 वाजता सुटलेली गाडी सावंतवाडी स्थानकात दुसऱ्या दिवशी सकाळी 9.30 ला येईल. परतीची 01102 गाडी 16 ते 23 ऑगस्ट दरम्यान धावणार आहे. सावंतवाडी स्थानकातून सकाळी 10.10 वाजता निघालेली गाडी सीएसटी स्थानकात रात्री 9.40 ला पोचणार आहे. या गाडीला कुडाळ, सिंधुदुर्ग कणकवली, वैभववाडी, राजापूर, आडवली, रत्नागिरी, संगमेश्‍वर, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पनवेल, ठाणे, दादर येथे थांबा आहे. 
गाडी नं.01103 लोकमान्य टिळक टर्मिनस ते कुडाळ ही गाडी 15 ते 22 ऑगस्ट दरम्यान धावणार आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री 11.50 वाजता सुटलेली ही गाडी कुडाळ स्थानकात दुसऱ्या दिवशी सकाळी 10.30 वाजता येईल. परतीची 01104 कुडाळ-लोकमान्य टिळक टर्मिनस ही गाडी 16 ते 23 ऑगस्ट या दरम्यान धावणार आहे. कुडाळ येथून दुपारी 12 वाजता निघालेली ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनसला रात्री 11 वाजता पोचणार आहे. या गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली, संगमेश्‍वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, नांदगाव, कणकवली आणि सिंधुदुर्ग येथे थांबा आहे. 

हेही वाचा - समाधानकारक ! पीक विमाधारकांत सिंधुदुर्गात तिप्पट वृद्धी  

गाडी नं.01113/01114 लोकमान्य टिळक टर्मिनस-सावंतवाडी-लोकमान्य टिळक टर्मिनस ही गाडी 24 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या दरम्यान धावणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस येथून पहाटे 5.30 वाजता सुटलेली ही गाडी सावंतवाडी स्थानकात सायंकाळी 3.30 वाजता येणार आहे. तर सावंतवाडीतून सायंकाळी 5.30 वाजता निघालेली गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 6.15 वाजता पोचणार आहे. या गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली, संगमेश्‍वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ येथे थांबा आहे. 

गाडी नं.01111/01112 मुंबई सीएसटीएम-सावंतवाडी-मुंबई सीएसटीएम ही गाडी 25 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या दरम्यान धावणार आहे. सीएसटीम स्थानकातून पहाटे 5.50 वाजता सुटलेली ही गाडी सावंतवाडीत सायंकाळी 4.15 वाजता पोचेल. तर सावंतवाडीतून सायंकाळी 6.15 वाजता निघालेली ही गाडी सीएसटीएम स्थानकात पहाटे 5.50 वाजता पोचणार आहे. या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्‍वर, रत्नागिरी, आडवली, राजापूर, विलवडे, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ येथे थांबा आहे. 

गाडी नं.01109/01110 मुंबई सीएसटी-सावंतवाडी-मुबई सीएसटी ही गाडी 25 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या दरम्यान धावणार आहेत. सीएसटीएम स्थानकातून सकाळी 7.10 वाजता निघालेली ही गाडी सावंतवाडी स्थानकात सायंकाळी 7.15 वाजता पोहोचेल. तर सावंतवाडीतून रात्री 8.35 ला निघालेली ही गाडी सीएसटीएम स्थानकात दुसऱ्या दिवशी सकाळी 6.45 वाजता पोचणार आहे.

या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्‍वर, रत्नागिरी, विलवडे, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ येथे थांबा आहे. 
गाडी नं. 01115/01116 लोकमान्य टिळक टर्मिनस-रत्नागिरी-लोकमान्य टिळक टर्मिनस ही गाडी 25 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या दरम्यान धावणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकातून सकाळी 11.15 वाजता निघालेली ही गाडी रत्नागिरीत सायंकाळी 7 वाजता पोहोचेल. तर रत्नागिरीतून रात्री 8.30 वाजता निघालेली ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकात पहाटे 4.15 वाजता पोचणार आहे. 

24 डब्यांची रचना 
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सर्व रेल्वे गाड्यांना 24 डबे असून वातानुकूलीत टु टियर 1, थ्री टियर 4, स्लिपर 13, जनरल 4 आणि एसएलआर 2 अशी रचना आहे. प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Finally Konkan Railway will run