देवरुखला सापडला १९ वर्षीय युवतीचा मृतदेह

सकाळ वृत्तसेवा
Friday, 20 November 2020

शवविच्छेदन अहवालानंतरच ही आत्महत्या की घातपात हे स्पष्ट होणार आहे.

देवरुख : शहरातील चोरपऱ्यामधे आज दुपारी एका युवतीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच ही आत्महत्या की घातपात हे स्पष्ट होणार आहे.

पुजा हेमंत शिंदे ( वय, १९ रा. देवरुख) असे युवतीचे नाव आहे. आज दुपारी जेवण झाल्यानंतर तिला दुकानात बोलावण्यात आले होते. मात्र ती दुकानात गेली नाही. यानंतर काही वेळातच चोरपऱ्यात एका युवतीचा मृतदेह काही नागरिकांना दिसला. त्यांनी याची माहिती नगरपंचायतीला दिली. त्यानंतर नगरपंचायतीने पोलिसांना याची माहिती दिली. 

पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जावून पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेतला. 

हे पण वाचा - भास्कर जाधवांनी सांगितले गडकिल्ल्यांचे महत्त्व

दरम्यान, काही काळ तिची ओळख पटत नव्हती. मात्र त्यानंतर तिचे कुटुंबीय घटनास्थळी आल्यामुळे तिची ओळख पटली. 

तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमेश्वरला पाठवण्यात आला असून त्याच्या अहवालानंतरच  ही आत्महत्या की घातपात हे स्पष्ट होणार आहे. 
 

संपादन - धनाजी सुर्वे  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: finds body of 19 year old girl in Devrukh

Tags
टॉपिकस
Topic Tags: