कुंभार्ली घाटात पोलिसांकडून चौकशी; E-pass नसल्यास माघारी

कोणी हुज्जत केली तर वाहनाचे फोटो काढून ऍपद्वारे दंडात्मक कारवाई
कुंभार्ली घाटात पोलिसांकडून चौकशी; E-pass नसल्यास माघारी

चिपळूण : 'ब्रेक दी चेन' (break the chain) मोहिमेअंतर्गत जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी तसेच परजिल्ह्यातून येण्यासाठी ई - पास (E-pass) बंधनकारक करण्यात आले आहेत. कुंभार्ली घाटातून जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यांची कडक तपासणी पोलिसांकडून सुरू आहे. पास नसलेल्या व्यक्तींना दंड आकारला जात आहे. अनेकांना परतही पाठविले जात आहे.

ज्यांच्याकडे पोलिसांना ई-पास मिळत नाही अशा व्यक्तींना परत पाठवले जाते. कोणी हुज्जत केली तर वाहनाचे फोटो काढून ऍपद्वारे दंडात्मक (Fine) कारवाई केली जाते. अत्यावश्‍यक सेवेतील वाहने थांबवून त्यांची चौकशी केली जाते. दूध, भाजीपाला आणि इतर अत्यावश्‍यक सेवा पुरवणाऱ्या वाहनांमधून प्रवासी वाहतूक सुरू आहे का, याचीही चौकशी पोलिसांकडून केली जात आहे.

कोरोनाची चेन (covid-19) तोडण्यासाठी राज्य सरकारकडून पुन्हा लॉकडाउन (lockdown) लागू करण्यात आले. तेव्हापासून कुंभार्ली घाटात पोलिसांची कडक नाकाबंदी लावण्यात आली आहे. आंतरजिल्हा प्रवासाचे निर्बंध कडक करण्यात आले आहेत. कुंभार्ली (kumbharli) घाटातील रत्नागिरी जिल्ह्याच्या (ratnagiri district) सीमेवर अलोरे-शिरगाव पोलिसांचे चेकपोस्ट आहे. त्या ठिकाणी अलोरे-शिरगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी, होमगार्डस्‌ आणि शिक्षकांचा खडा पहारा आहे. घाटात असलेल्या पथकाला चुकवून कुणी जाऊ नये यासाठी बॅरिकेटस्‌ लावण्यात आले आहेत.

कुंभार्ली घाटात पोलिसांकडून चौकशी; E-pass नसल्यास माघारी
'परिपत्रकाचा अर्थ आपल्या सोयीने नको'

नागरिकांना अत्यावश्‍यक कामानिमित्त आंतरजिल्हा प्रवास करण्याची आवश्‍यकता भासू शकते. वैद्यकीय आणीबाणी, अंत्यविधी किंवा अत्यावश्‍यक कामानिमित्त बाहेर जाणे गरजेचे असल्यास नागरिकांना पोलिसांच्या संकेतस्थळावर ई-पास दिले जाते. सबळ कारण असल्यास ई-पास दिले जाते. ते पास असलेल्या लोकांनाच घाटातून प्रवेश दिला जात आहे. घाटात वाहन आल्यानंतर पोलिसांकडून ई-पासची चौकशी केली जाते.

ई-पास असेल तर वाहन क्रमांक, गाडीतील प्रवासी आणि प्रवासाच्या कारणाची शिक्षकांकडून नोंद करून घेतली जाते. त्यानंतर वाहन पुढे सोडले जाते. दुचाकीस्वारांकडे ई-पाससह, हेल्मेट आणि वाहन चालवण्याचा परवाना याची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी तसेच जिल्ह्यात येण्यासाठी ई-पास आवश्‍यक आहे. ग्रामीण भागात मात्र तांत्रिक अडचणींमुळे ई-पाससाठी अर्ज करता येत नाही. त्यामुळे काही प्रवासी जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधत अत्यावश्‍यक प्रवास करण्याचे कारण पोलिसांना सांगत आहेत.

कुंभार्ली घाटात पोलिसांकडून चौकशी; E-pass नसल्यास माघारी
केळीच्या बागेत कलिंगडचे आंतरपीक; एकरी 32 टनाचे विक्रमी उत्पन्न

"वरिष्ठांच्या आदेशानुसार कुंभार्ली घाटात कडक नाकाबंदी आहे. परजिल्ह्यातून येणाऱ्यांची कसून चौकशी केली जात आहे. ज्यांच्याकडे पास नाही अशा व्यक्तींना पोलिस कर्मचारी परत पाठवत आहेत. जिल्ह्यात येणाऱ्या आणि जाणाऱ्यांची नोंद ठेवली जात आहे."

- संदीप पाटील, सहाय्यक पोलिस निरिक्षक चिपळूण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com