अलिबाग समुद्र किनारी मच्छिमारी बोट बुडाली

दिनेश पिसाट
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

रायगड -  अलिबाग वरसोली समुद्रात आज पहाटे मच्छिमारी बोट बुडाली. प्रसंगावधान साधत आठ मच्छिमारांनी समुद्रात उड्या टाकून किनारा गाठला त्यामुळे ते बचावले. 

रायगड -  अलिबाग वरसोली समुद्रात आज पहाटे मच्छिमारी बोट बुडाली. प्रसंगावधान साधत आठ मच्छिमारांनी समुद्रात उड्या टाकून किनारा गाठला त्यामुळे ते बचावले. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, उरण मोरा बंदरातून आठ मच्छिमार मच्छीमारीसाठी निघाले होते. पण अलिबाग वरसोली समुद्रात आल्यानंतर त्यांच्या बोटीचे इंजिन बंद पडले. त्यांनी ते चालू करण्याचा प्रयत्न केला मात्र ते चालू न झाल्याने त्यांनी पहाटे चारच्या सुमारास समुद्रात नांगर टाकला. समुद्रात जोरदार उसळलेल्या लाटांमुळे त्यांच्या बोटीचा नांगर तुटला. प्रसंगावधान साधत बोटीतील आठ मच्छिमारांनी लाईफ जॅकेट घालून समुद्रात उड्या टाकल्या आणि ड्रमच्या सहाय्याने ते किनारी पोहोचले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Finishing Boat sink in Alibag sea