
रत्नागिरी : तालुक्यातील मालगुड, निवेंडी, चाफे, कळझोंडी या परिसरात वणव्याचा आगडोंब उसळला. काल सकाळी अचानक लागलेला वणवा हा-हा म्हणता सर्वत्र पसरला. वणव्यात पाच आंबा, काजूच्या बागा खाक झाल्या. पाच तासांच्या वणव्यात आंब्यांची ६१०, तर काजू सुमारे २८० कलमे खाक झाली आहेत. बागायतदार, स्थानिकांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर दुपारी तीनला वणवा विझवण्यात यश आले. आगीच्या तांडवात कलमे, वीजपंप, वायरी, पाईप आदींचे लाखोंचे नुकसान झाले आहे.
चाफे, निवेंडी-धनगरवाडी, कळझोंडी या परिसरात सकाळी अचानक वणवा लागला. सकाळी दहाला लागलेल्या या वणव्याला वाऱ्यामुळे आगीचा डोंब उसळत गेला. सुक्या गवातामुळे काही क्षणात वणव्याने आंबा, काजू कलमांच्या बागा घेरल्या. बागायतदार आणि स्थानिकांनी आग आटोक्यात आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, वणवा पसरत नियंत्रणाच्या बाहेर गेला. आगीत आंबा-काजू कलमे होरपळताना शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आले. सुमारे पाच तास हे आगीचे तांडव सुरू होते.
"ऐन आंबा हंगामात आम्ही अनेक वर्षे सांभाळलेली आंबा, काजू कलमे आमच्या डोळ्यांदेखत होरपळत होती. आम्ही बागायतदार झालो आहोत. जिल्हा प्रशासन आणि वन विभागाने याची दखल घेऊन आम्हाला नुकसानभरपाई मिळवून द्यावी."
- बाबाजी कोकरे, बाधित बागायतदार
संपादन - स्नेहल कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.