अचानकच घराला लागली आग ; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

fire in ratnagiri konkan to house but no injured in this case
fire in ratnagiri konkan to house but no injured in this case
Updated on

रत्नागिरी : तालुक्यातील सैतवडे येथील बोरसई मोहल्ला येथील मुद्दस्सर खलपे यांच्या घराला शनिवारी रात्री आग लागली. बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले. संपूर्ण घर आगीच्या विळख्यात सापडले. आग कशाने लागली याचे कारण समजू शकले नसले तरी या आगीत मोठे नुकसान झाले आहे. 

शनिवारी रात्री ही दुर्घटना घडली. अचानक लागलेल्या आगीत मनुष्यहानी झाली नसली तरी खलपे कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सैतवडे बोरसई मोहल्ला येथे मुद्दसर खलपे यांच्या घराला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी जयगड येथील पोर्ट एनर्जी चोघुले कंपनी येथील अग्निशमन दल, जयगड खंडाळा पोलीस, सैतवडे सरपंच सागर कदम, गुंबद सरपंच उषा सावंत, मुनाफशेठ वागळे, अजिम चिकटे, साजिद शेकासन, अनिकेत सुर्वे, बानू खलपे, राजेश पालशेतकर, बोरसई ग्रा.पं. सर्व सदस्यअसे  गावातील सर्व तरुणांनी आग विझवण्याचे आटोकाट प्रयत्न करीत होते.

या ठिकाणी बंब बोलावून आग आटोक्यात येईपर्यंत स्वतः जि.प.सदस्या ऋतुजा जाधव उपस्थित होत्या. त्यांनी ही घटना ज्येष्ठ उद्योजक अण्णा सामंत व रत्नागिरी तहसीलदार जाधव यांच्या बरोबर रात्रीच फोनवर चर्चा करून परिस्थितीचे गांभीर्य सांगितले आणि मदतीची मागणी केली आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com