क्षणार्धात होत्याचं नव्हतं...काय घडलं?

Fire in sawantwadi
Fire in sawantwadi
Updated on

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - खासकीलवाडा येथील रहिवासी सुरेश वारंग यांच्या पत्र्याची शेड असलेल्या मांगराला अचानक आग लागली. या आगीत त्यांच्या शेडमधील दोन दुचाकी गाड्या, तीन सायकल तसेच सिलेंडर, शेगडी, वोशिंग मशीन आदी बहुतांश साहित्य जळून खाक झाले. ही आग लागताच आजूबाजूच्या नागरिकांनी आरडाओरडा केल्यामुळे अग्निशमन बंबला पाचारण करण्यात आले. त्यामुळे आग विझवण्यात यश आले. यात श्री. वारंग यांचे अंदाजे दीड लाखाचे नुकसान झाले असून याबाबत पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

खासकीलवाडा येथील रहिवासी श्री. वारंग यांच्या घराच्या खालच्या बाजूस पत्र्याची शेड आहे. या शेडमध्ये वापरातील तसेच विना वापरातील वस्तू आहेत. आज मध्यरात्री अडीचच्या सुमारास या शेडला अचानक आग लागली. त्यानंतर या शेडमध्ये असलेल्या तेलाच्या रिकाम्या कॅनमुळे या आगीने रौद्ररूप धारण केले. रात्री तेथील नागरिकांनी काही तरी जळण्याचा वास आल्याने त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता वारंग यांच्या शेडला आग लागल्याचे निदर्शनास आले.

यावेळी आजूबाजूच्या नागरिकांनी एकत्र येत श्री. वारंग यांना कल्पना दिली. तसेच घरातील पाणी आणून आग विझवण्याचा प्रयत्न केला; मात्र आगीच्या झळा एवढ्या होत्या की ती विझवण्यात यश आले नाही. त्यानंतर तातडीने पालिकेच्या अग्निशमन बंबाला पाचारण करण्यात आले. तोपर्यंत शेडमधील अर्धे अधिक समान जाळून खाक झाले. अखेरीस बंबने पाणी मारून ही आग विझवण्यात आली. आग लागलेल्या वेळी शेडमध्ये असलेल्या वारंग यांच्या दोन दुचाकी काढण्याचा प्रयत्न नागरिकांनी केला; मात्र हॅंडल लॉक असल्यामुळे तसेच आगीचा भडका उडल्यामुळे यात यश आले नाही.

या शेडमध्ये ठेवलेली दोन दुचाकी, वाॅशिंग मशीन, जुने साहित्य, गॅस शेगडी, तीन सायकल, घरगुती साहित्य, सिलेंडर आदी साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या मांगरात कोणीही राहत नसल्याने सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. शिवाय आग वेळीच विझवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Long Struggle for Sawantwadi Station Naming Highlights Madhu Dandavate’s Legacy
ancient well discovered at Sagar Fort
Public Outrage Against Toll Collection on Incomplete Mumbai–Goa Highway
Woman Critically Injured as Container Rams Motorcycle on Mumbai–Goa Route
Marathi News Esakal
www.esakal.com