esakal | पन्नास हजाराची खंडणी दे, नाहीतर इथंच वाजवीन गेम म्हणत झाडली गोळी...

बोलून बातमी शोधा

firing as a refusal to ransomware in kokan marathi news

पन्नास हजाराची खंडणी दे, नाहीतर इथंच गेम वाजवीन, अशी धमकी देत नामचिन गुंडाने काल (ता. २१) रात्री नॅशनल मोबाईलच्या मालकाकडून खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न केला.

पन्नास हजाराची खंडणी दे, नाहीतर इथंच वाजवीन गेम म्हणत झाडली गोळी...
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : पन्नास हजाराची खंडणी दे, नाहीतर इथंच गेम वाजवीन, अशी धमकी देत नामचिन गुंडाने काल (ता. २१) रात्री नॅशनल मोबाईलच्या मालकाकडून खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न केला. खंडणी देण्यास नकार दिला म्हणून बिल्डिंगच्या पार्किंगमध्येच त्यांच्यावर गोळी झाडली आणि गुंड तेथून पसार झाला. पोलिस अजूनही त्याच्या मागावर आहे. मनोहर सखाराम ढेकणे (वय ६३, रा. फडके उद्यान, रत्नागिरी) असे प्राणघातक हल्ला झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. 

आठवडा बाजारात त्यांची नॅशनल मोबाईल शॉपी आहे. ते सर्वांत जुने मोबाईल व्यावसायिक आहेत. काल रात्री साडेनऊच्या दरम्यान हा हल्ला झाला. जखमी ढेकणे यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबामध्ये स्पष्ट म्हटले आहे की, सचिन जुमनाळकर यानेच आपल्यावर गोळी झाडली. जुमनाळकर याने ढेकणे यांना फोन करून बोलावून घेतले. ते फोनवर बोलत बिल्डिंगच्या पार्किंगला आले. लक्ष्मी नारायण अपार्टमेंट असे त्यांच्या बिल्डिंगचे नाव आहे. सचिन जुमनाळकर एका सहकाऱ्याला घेऊन आला होता. तो समोर आला आणि ५० हजारांची खंडणी मागितली. मात्र यावरून वादावादी झाली. खंडणी देण्यास मी नकार दिला. याचा राग धरून पैशासाठी जुमनाळकर याने थेट गोळीबार केला. यामध्ये ढेकणे यांच्या पोटात गोळी लागल्याचे जबाबावरून स्पष्ट झाले.

हेही वाचा  - सिंधुदूर्गात सर्जेकोट गावाने आणला नवा पॅटर्न... कसा तो वाचा..

फोन करून बोलावून घेतले

 सचिन जुमनाळर पूर्ण तयारीने आणि खंडणी मागण्याच्या उद्देशानेच आला होता. ढेकणे यांच्यावर गोळी का आणि कशासाठी झाडली याची चौकशी सुरू असताना ही माहिती पुढे आली. पोलिसांनी जुमनाळकर याचा शोध सुरू केला आहे. काही संशयित देखील ताब्यात घेतल्याचे समजते; मात्र सूत्रधार जुमनाळकर अजून मिळालेला नाही. या हल्ल्यामध्ये जखमी झालेले ढेकणे यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. संशयितांविरोधात खुनी हल्ला, खंडणी आणि बेकायदेशीर हत्यार बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 


हेही वाचा  - यंदा मुंबईकरांची उन्हाळी सुटी होणार स्पेशल...का ते वाचा..?

गुन्हा केल्यानंतर तो येथे आला
सचिन जुमनाळकर येथील फय्याज हकीम खून प्रकरणात सामील होता. त्यात तो सोलापूर येथील कारागृहात शिक्षा भोगत होता. २६ नोव्हेंबर २०१९ ला पॅरोलवरची रजा संपली होती. त्यानंतर तो हजर होणे आवश्‍यक होते. मात्र, तो हजर न झाल्याबाबत मंद्रुप पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. जुमानळकर रत्नागिरीतील असल्याने स्थानिक पोलिसांना याबाबत अवगत केले नव्हते. त्यामुळे जुमानळकरने गुन्हा केल्यानंतर तो येथे असल्याची माहिती पुढे आली.