राणे बंधुना दिली 'या पदाची' महत्वपूर्ण जबाबदारी... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

first executive of the district council in sawantwadi kokan marathi news

भाजपा जिल्हाध्यक्षपदी राजन तेली यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर जिल्ह्याची पहिलीच कार्यकारणी त्यांनी आज येथे जाहीर केली.

राणे बंधुना दिली 'या पदाची' महत्वपूर्ण जबाबदारी...

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) :  भाजपा जिल्हाध्यक्षपदी राजन तेली यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर जिल्ह्याची पहिलीच कार्यकारणी त्यांनी आज येथे जाहीर केली. यामध्ये जिल्हा सरचिटणीसपदी (संघटन) जयदेव कदम तर जिल्हा प्रवक्तेपदी नगराध्यक्ष संजू परब, बाबा मोंडकर यांचा समावेश करण्यात आला असून जिल्हा उपाध्यक्ष व अन्य इतर पदा बरोबर एकूण 40 जणांची निवड कार्यकारणीत करण्यात आली आहे.येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ही कार्यकारणी जाहीर करण्यात आली

. यावेळी श्री. तेली म्हणाले, “जुन्या व नव्या कार्यकर्त्यांचा समावेश करून योग्य ताळमेळ साधण्याचा प्रयत्न या कार्यकारिणीतून करण्यात आला असून पहिल्या टप्प्यातील ही कार्यकारिणी आहे. लवकरच अजून दोन टप्प्यात कार्यकारणी जाहीर करण्यात येणार असून पक्षसंघटना वाढवण्याबरोबरच पक्षाचे काम तळागाळापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने काम करण्यात येणार आहे.”

हेही वाचा- हापूस खायचा आहे मग दया पाच ते नऊ हजार रुपये...

सर्वसामान्यांना न्याय व काम देण्यावर भर

येणार्‍या काळात भाजपाचे पदाधिकारी आक्रमक भूमिका मांडून येथील भ्रष्ट अधिकारी व कामचुकार अधिकारी यांना जागा दाखवण्याचे काम पदाधिकारी करणार आहेत. सर्वसामान्यांना न्याय देण्याबरोबरच त्यांची कामे करण्यावर आमचा भर राहणार असल्याचे तेली यांनी सांगितले.जाहीर केलेल्या कार्यकारणीमध्ये जिल्हाध्यक्ष राजन तेली, कायम निमंत्रित म्हणून निलेश राणे, आमदार नितेश राणे, प्रमोद जठार, अ‍ॅड. अजित गोगटे, अतुल काळसेकर, दत्ता सामंत, विजयकुमार मराठे, श्यामकांत काणेकर, गुरुनाथ राऊळ, विलास हडकर, संदीप कुडतरकर, जिल्हा सरचिटणीस (संघटन) जयदेव कदम, सरचिटणीसपदी मधुसूदन बांदिवडेकर, प्रसन्ना देसाई, अशोक सावंत,

हेही वाचा - धक्कादायक : रत्नागिरीत सातशे रुपयांसाठी मित्रानेच केली मित्राची हत्या..


जाहीर केलेल्या कार्यकारणीमध्ये पदाधिकारी...

उपाध्यक्षपदी प्रमोद रावराणे, संदेश सावंत, मनोज नाईक, प्रमोद कामत, एकनाथ नाडकर्णी, रणजित देसाई, प्रभाकर सावंत, जिल्हा प्रवक्तेपदी संजू परब, बाबा मोंडकर, कोषाध्यक्षपदी चारुदत्त देसाई, महिला प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रज्ञा ढवण, राष्ट्रीय परिषद सदस्य पुखराज पुरोहीत, मंदार कल्याणकर, सुरेश सावंत, चिटणीसपदी महेश सारंग, प्रकाश राणे, नीलेश सामंत, अनिल सावंत, रवींद्र शेटये, विजय केनवडेकर, कायदा सेलपदी अ‍ॅड राजेश परूळेकर व सहकार सेलपदी कमलाकांत कुबल यांची निवड करण्यात आली आहे.

टॅग्स :Sindhudurg